हिवाळ्यात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:38 PM2019-11-05T14:38:52+5:302019-11-05T14:42:30+5:30

हिवाळ्यात आवळ्याची अवाक् वाढते. तसेच बाजारातही मुबलक प्रमाणात आवळे उपलब्ध होतात. आवळ्याची चटणी, मुरांबा अनेक लोकांना आवडतो. तसेच हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतं.

Health benefits of amla murabba or aavlyacha muramba | हिवाळ्यात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्

हिवाळ्यात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

हिवाळ्यात आवळ्याची अवाक् वाढते. तसेच बाजारातही मुबलक प्रमाणात आवळे उपलब्ध होतात. आवळ्याची चटणी, मुरांबा अनेक लोकांना आवडतो. तसेच हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतं. आवळा एक औषधी फळ असून आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आवळ्यात व्हिटॅमिन सी, आयर्न, फायबर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतं. जसा आवळा आरोग्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी असतो, तसाच त्यापासून तयार होणारा मुरांबाही हेल्दी असतो. आवळ्याचा मुरांबा हाडांसाठी अत्यंत मजबुत असतो. शरीरामध्ये होणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आवळा अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्याचा मुरांबा सकाळच्या वेळी खाल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. त्याचबरोबर शरीराचा थकवाही दूर होतो. शरीराला लगेच एनर्जी देण्यासाठीही आवळा मदत करतो. त्याचबरोबर आवळ्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया आवळ्याच्या मुरांब्याचे फायदे... 

आवळ्याचा मुरांबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे : 

1. गरोदरपणात याचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर असतं. आईसोबतच आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी हा मुरांबा फायदेशीर ठरतो. जर गरोदरपणात आवळ्याचा मुरांबा नियमितपणे खात असाल तर शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. आवळा ही समस्या दूर करण्यासाठी मदत करते. 

2. व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आवळ्याचा मुरांबा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. हा मुरांबा ताप आणि इन्फेक्शनपासूनही दूर ठेवतो.

 

3. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळला असाल तर आवळ्याचा मुरांबा फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान वेदना होत असतील आणि पोट, कंबर दुखीने हैराण झाले असाल तर 1 ते 2 महिन्यांसाठी याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामुळे वेदनांपासून सुटका होते. 

4. आवळ्यात आयर्न मुबलक प्रमाणात असतं. यामध्ये हिमोग्लोबिन लेव्हल वाढविण्याची क्षमता असते. शरीरामध्ये सतत रक्ताची कमतरता होत असेल तर आवळ्याचा मुरांबा अत्यंत फायदेशीर ठरतो. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होत असेल तर त्यावरही आवळ्याचा मुरांबा फायदेशीर ठरतो. 

5. क्रोमियम, झिकं आणि कॉपर मुबलक प्रमाणात असणाऱ्या आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. क्रोमियम विशेषतः रक्तातील कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. आवळ्याचा मुरांबा थियोबारबिट्यूरिक अॅसिड आणि टीबीपासून बचाव करण्यासाठी मदत करतो. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Health benefits of amla murabba or aavlyacha muramba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.