शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

नेहमी एकाच प्रकारचे पदार्थ खाता का?; वेळीच सवय बदला अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:33 IST

तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे.

तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे. तसं अनेक लोकांना वाटतं की, दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे. कारण त्या व्यक्ती नेहमी तेच पदार्थ खात असतात. परंतु, तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते.  जाणून घेऊया अशी 5 कारणं ज्यांमुळे दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. 

पोषक तत्वांची कमतरता 

आपल्या शरीराला अनेक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएट्ंसची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. ही गरज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्याने पूर्ण होते. पण जर तुम्ही एकाच प्रकारची फळं किंवा भाज्या खात असाल तर शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासते. आपल्या आहारात अनेक प्रकारची फळं आणि भाज्यांचा समावेश असणं गरजेचं असतं. 

अन्ननलिकेवर होतो वाईट परिणाम

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक प्रकारचे पदार्थ खाल्याने अन्ननलिकेवरही परिणाम होतो. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्याने अन्ननिलिकेमध्ये चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते. त्यामुळे शरीराच्या रोगप्रितिकार शक्तीवर चांगला परिणाम होतो. जेवणामध्ये फर्मेंटेड फूड, फळं आणि भाज्या यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

वजन कमी करण्याची प्रक्रियेमध्ये अडथळा

दररोज एकाच प्रकारचे पदार्थ खाल्याने वजन कमी करण्याची प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. एका रिसर्चमधून निष्पन्न झाल्यानुसार, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या खातात. त्यावेळी त्यांचं वजन वेगाने कमी होतं. 

एकाच प्रकारच्या पोषक तत्वांचं सेवन करणं टाळा 

एखाच प्रकारचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने आपल्या शरीरामध्ये एकाच प्रकारच्या तत्वांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालचं तर हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते परंतु, मोठ्या प्रमाणात खाल्याने लिव्हरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

(Image Credit : santecenter.co)

होऊ शकतो इटिंग डिसऑर्डर 

एकाच प्रकारचे अन्नपदार्थ खाल्याने तुम्हाला सिलेक्टिव्ह इटिंग डिसऑर्डर होऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये व्यक्ती काही फूड कलर्स, टेक्शर आणि त्यांचा गंधामुळे डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. यामुळे शरीरातील पोषक तत्वांमध्ये कमतरता होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य