हिवाळ्यात नाही वाढणार वजन; आहारात खा रताळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:38 PM2018-11-27T16:38:17+5:302018-11-27T16:39:46+5:30

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे जास्त भूक लागते. परंतु थंडीमुळे आपली फिजिकल अॅक्टिविटी कमी होते. त्यामुळे वजन वाढणं फार स्वाभाविक आहे.

eat sweet potatoes regularly for weight control | हिवाळ्यात नाही वाढणार वजन; आहारात खा रताळी!

हिवाळ्यात नाही वाढणार वजन; आहारात खा रताळी!

googlenewsNext

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे जास्त भूक लागते. परंतु थंडीमुळे आपली फिजिकल अॅक्टिविटी कमी होते. त्यामुळे वजन वाढणं फार स्वाभाविक आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असा उपाय ज्यामुळे थंडीमध्ये तुम्ही पोटभर खाऊही शकता आणि त्यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही. हा उपाय म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेली आणि उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाणारी रताळी. 

हिवाळ्यामध्ये जर तुम्ही चविष्ट पदार्थांसोबत अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नसाल तर, आपल्या डाएटमध्ये रताळ्यांचा समावेश करा. रताळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर आणि फॅट फ्री कॅलरी यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. 

रताळी जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये खाण्याचा जवळपास सर्वचजण सल्ला देत असतात. अनेकदा वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेमध्ये बटाटे आणि गोड पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात येतो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च मोठ्या प्रमाणावर असून हे शरीरासाठी घातक असतं. त्यामुळे जर गोड पदार्थ आणि बटाट्याऐवजी रताळ्यांचा डाएटमध्ये समावेश केला तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 

रताळ्यांमध्ये असलेल्या न्यूट्रिशनल वॅल्यूबाबत बोलायचे झाले तर त्यामध्ये फक्त 112 कॅलरी असतात. त्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. रताळ्यांमध्ये फायबरची मात्रा एक बाउल ओटमील इतपत असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

रताळ्यामुळे शरीराला आवश्यक शुगर मिळण्यास मदत होते. यामध्ये ग्लायमेक्स इंडेक्स असतं, जे शरीरामधील साखरेला मॅनेज ठेवतं आणि त्याचबरोबर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. ज्या व्यक्ती एक हेल्दी डाएट प्लॅन करत आहेत त्यांनी रताळ्यांचा अवश्य आहारात समावेश करावा. कारण रताळ्यांमधील पोषक तत्व शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. कारण रताळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड सेल्सला ऊर्जा मिळण्यासोबतच मेटाबॉलिझम प्रोसेस जलद गतीने होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातून हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीही फायदेशीर ठरतं. 

जास्तीत जास्त लोक व्हेजिटेबल्सऐवजी रताळी खातात. रताळी शिजवण्यासाठी फार कमी वेळ लागतो आणि तयार करण्यासाठी फार कष्टही येत नाहीत. रताळी उकडून, भाजून खाता येतात. तुम्ही रताळ्याचं चाट तयार करूनही खाऊ शकता. 

Web Title: eat sweet potatoes regularly for weight control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.