शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 11:55 AM

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो. प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही लसणाचं सेवन गुणकारी ठरतं. आलं आणि लसूण एक नैसर्गिक अॅन्टीसेप्टिक आहे.

आलं आणि लसणाच्या सेवनामुळे अनेक रोग दूर राहतात. लसूण आणि आल्यामध्ये बिटा कॅरोटीनही आढळून येतं. शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी लसूण आणि आल्याचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही आलं-लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. अशातच दररोज आलं आणि लसणाचं लोणचं डाएटमध्ये समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं. आज आम्ही आलं-लसणाच्या लोणच्याच्या फायद्यांसोबतच ते तायर करण्याची योग्य पद्धतही सांगणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर... 

आलं-लसणाचं लोणचं तयार करण्यासाठी साहित्य : 

  • 1 किलो सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
  • अर्धा किलो आलं 
  • 50 ग्रॅम वाटलेली मोहरी 
  • 50 ग्रॅम बडिशोप 
  • 20 ग्रॅम हळदीची पावडर 
  • 30 ग्रॅम 
  • एक चमचा ओवा 
  • मीठ चवीनुसार 
  • 40 ग्रॅम मिरची पावडर 
  • अर्धा लीटर मोहरीचं तेल 

 

आलं आणि लसणाचं लोणचं तयार करण्याची कृती : 

- लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घ्या. आल्याचीही साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावे. दोन्ही उन्हामध्ये कमीत कमी 2 तासांसाठ सुकवून घ्या. - एका कढईमध्ये बडिशोप, अर्धा लीटर मोहरीचं तेल एकत्र करून परतून घ्या. - तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं, मिरची, हळद आणि मीठ व्यवस्थित एकत्र करा. - आलं आणि लसणाचं लोणचं तयार आहे. एखाद्या हवाबंद डब्यात ठेवून द्या. - लोणचं काच किंवा मातीच्या भांड्यात ठेवू शकता. - लोणचं व्यवस्थित एकत्र करा आणि दररोज दोन तासांसाठी उन्हात ठेवा. - तयार लोणचं तुम्ही 4 किंवा 5 दिवसांनंतर खाऊ शकता. 

लसूण आणि आल्याचं लोणचं खाण्याचे फायदे : 

- दररोज या लोणच्याचं सेवन केल्याने हाडं मजबुत होतात. तसेच आजारांपासूनही बचाव होतो. सांधेदुखी आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. - डायबिटीसच्या रूग्णांसाठी आलं-लसणाचं लोणचं अत्यंत फायदेशीर ठरतं. - थंडीत ब्लड सर्क्युलेशन उत्तम ठेवण्यासाठी आलं-लसणाचं लोणचं अत्यंत फायदेशीर ठरतं. - आलं लसणाचं लोणचं हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. - जर तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येने हैराण असाल तर आलं-लसणाचं लोणचं फायदेशीर ठरेल. - दररोज डाएटमध्ये आलं-लसणाचं लोणचं खाल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीReceipeपाककृतीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स