साडी नेसलेल्या गोंडस चिमुकलीला ओळखलं का? 'वीर शिवाजी' हिंदी मालिकेत झळकलेली मराठी अभिनेत्री, आता आहे बिजनेसवुमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:38 IST2026-04-29T12:35:23+5:302026-04-29T12:38:37+5:30

फोटोमध्ये साडीत दिसणारी ही गोंडस चिमुकली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

एका मराठी अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोतल्या या चिमुकलीला पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

फोटोमध्ये साडीत दिसणारी ही गोंडस चिमुकली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव रुचिता जाधव आहे. रुचिताला 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.

पण, तिने 'वीर शिवाजी' या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारली होती.

'आता माझी हटली', 'भूताचा हनिमून', 'माणूस एक माती', 'जीवनसंध्या', 'पिल्लू बॅचलर', 'भविष्याची ऐशी तैशी' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.

रुचिता सध्या कलाविश्वात फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.

अनेकदा रुचिता तिचे फोटो शेअर करण्यासोबतच चाहत्यांना लाइफ अपडेट्स देत असते.

रुचिता आता एक बिजनेसवुमन आहे. ती स्वत:चा बिजनेस चालवते. २०२१ मध्ये रुचिताने आनंद माने यांच्याशी लग्न करत संसार थाटला असून ती संसारात रमली आहे.