सनी देओल सुसाट! २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:54 IST2026-04-18T17:53:13+5:302026-04-18T17:54:36+5:30

बॉलिवूडचा 'ॲक्शन किंग' सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'गदर २' आणि 'बॉर्डर २' नंतर आता सनीने एका भव्य ॲक्शन थ्रिलर चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. या सिनेमात सनी त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Sunny Deol romance with actress jyotika first time come together with a r murgadoss | सनी देओल सुसाट! २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता, कोण आहे ती?

सनी देओल सुसाट! २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता, कोण आहे ती?

बॉलिवूडचा 'ॲक्शन किंग' सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'गदर २' आणि 'बॉर्डर २' नंतर आता सनीने एका भव्य ॲक्शन थ्रिलर चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सनीने प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक ए.आर. मुरूगादास आणि बॉलिवूडचा अभिनेता-निर्माता फरहान अख्तर यांच्याशी हात मिळवले आहेत. या चित्रपटात सनी त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

पॉवरपॅक टीम आणि नवीन जोडी

या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी, सोशल मीडियावर याला 'अँथनी' (Anthony) असे म्हटले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची 'एक्सेल एंटरटेनमेंट' तसेच ए.आर. मुरूगादास संयुक्तपणे करत आहेत. या चित्रपटात सनी देओलसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांची फ्रेश जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ज्योतिका ही सनी पाजीपेक्षा तब्बल २१ वर्षांनी लहान आहे. दोघांचे रोमँटिक सीनही पाहायला मिळतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक हाय-व्होल्टेज ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून यात सनी देओल एका वेगळ्या आणि कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुरूगादास यांचे निकटवर्तीय बालाजी गणेश करत आहेत. सनी देओलने यापूर्वी अनेक मास एंटरटेनर्स दिले आहेत, मात्र हा चित्रपट सनी देओलसाठीही काहीसा वेगळा ठरणार असल्याचं सांगण्यात येतंय.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात झाली असून सध्या मुंबई आणि इतर ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. सनी देओल 'रामायण' चित्रपटातही झळकणार असून या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

Web Title : सनी देओल का एक्शन थ्रिलर, युवा अभिनेत्री संग रोमांस!

Web Summary : सनी देओल ए.आर. मुरुगादास और फरहान अख्तर के साथ एक एक्शन थ्रिलर में, संभावित रूप से 'एंथोनी' नामक, काम करेंगे। वह ज्योतिका के साथ अभिनय करेंगे, जो उनसे 21 साल छोटी हैं। फिल्मांकन 27 फरवरी, 2026 को शुरू हुआ। देओल 'रामायण' में हनुमान के रूप में भी दिखेंगे।

Web Title : Sunny Deol to romance younger actress in action thriller.

Web Summary : Sunny Deol teams with A.R. Murugadoss and Farhan Akhtar for an action thriller, possibly titled 'Anthony.' He will star opposite Jyothika, 21 years his junior. Filming started February 27, 2026. Deol will also appear in 'Ramayan' as Hanuman.