ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:42 IST2024-04-26T10:41:18+5:302024-04-26T10:42:53+5:30

RRR स्टारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Jr NTR lashed out at paparazzi when the were trying to follow him to the hotel | ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) आगामी हिंदी सिनेमा 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर दोघंही एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतंच वॉर 2 च्या शूटसाठी तो मुंबईत दाखल झाला. पुढे हॉटेलमध्ये जात असताना पापाराझी अगदी गेटपर्यंत पाठलाग करत असल्याने तो वैतागला आणि त्यांच्यावर भडकला. RRR स्टारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ज्युनिअर एनटीआर हॉटेलमध्ये दाखल झाला. तो फोनवर बोलत असतानाच हॉटेलमध्ये एन्ट्री करणार होता. त्याच्या मागे सुरक्षारक्षही होते. सुरक्षारक्षकांनी पापाराझींना आधीच रोखलं तरी पापाराझींनी दरवाज्यापर्यंत त्याचा पाठलाग केला. हे जेव्हा ज्युनिअर एनटीआरने पाहिलं तेव्हा तो भडकला. मोबाईल खाली करत तो 'ओएSSS' असं जोरात ओरडला. त्याचा हाच व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होतोय.

एखाद्या दाक्षिणात्य सुपरस्टारला पहिल्यांदाच पापाराझींवर भडकताना पाहिले गेले आहे. RRR सिनेमाच्या यशानंतर ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्यातच दोघांना बॉलिवूडमधूनही अनेक ऑफर्स येत आहेत. त्यात ज्युनिअर एनटीआर 'वॉर 2' मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Jr NTR lashed out at paparazzi when the were trying to follow him to the hotel