Happy Womens Day 2026 Wishes: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes शेअर करुन करा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या स्त्रीयांचा सन्मान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:44 IST2026-03-07T16:43:46+5:302026-03-07T16:44:23+5:30
Happy Women's Day 2026 Wishes: ८ मार्च रोजी तुमच्या आयुष्यातील 'ती'च्या सन्मानार्थ गौरवोद्गार 'या' शुभेच्छा संदेशातून व्यक्त करा, शेअर करा आणि तिचा दिवस साजरा करा.

Happy Womens Day 2026 Wishes: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes शेअर करुन करा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या स्त्रीयांचा सन्मान!
Happy Women's Day 2026 Wishes in Marathi: ८ मार्च, जागतिक महिला दिन ही केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही, तर तो आपल्या जीवनातील प्रत्येक 'ती'च्या संघर्षाचा, यशाचा आणि अफाट शक्तीचा सन्मान करण्याचा सोहळा आहे. मग ती घराला घरपण देणारी आई असो, प्रत्येक पावलावर साथ देणारी बहीण असो, संसाराचा कणा असलेली पत्नी असो किंवा कठीण काळात खंबीरपणे उभी राहणारी मैत्रीण असो; स्त्रीच्या रूपातील हे प्रेम, त्याग आणि शौर्य शब्दांत मांडणे तसे कठीणच. आजच्या धावपळीच्या युगात स्वतःला विसरून इतरांसाठी झटणाऱ्या या 'शक्ती'ला दाद देण्यासाठी आणि तिच्या पंखांना नवे बळ देण्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. याच भावनेतून, आपल्या आयुष्यातील या प्रेरणादायी स्त्रियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही काही निवडक आणि मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
खाली दिलेले हे सुंदर आणि प्रेरणादायी शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुक, आणि इन्स्टाग्रामवर नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यातील त्या खास स्त्रीला हा लेख पाठवून तिचा दिवस अधिक आनंदमयी बनवा.
तुझ्या अस्तित्वाने हे जग सुंदर आहे.
तू केवळ एक स्त्री नाहीस, तर तू एक क्रांती, एक प्रेरणा
आणि शक्तीचे रूप आहेस!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे विसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
आई, बहीण, पत्नी, लेकीस
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान"
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

प्रत्येक घर, प्रत्येक हृदय, प्रत्येक भावना,
प्रत्येक आनंदाचा क्षण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे,
हे जग फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
