बॉलिवूडची मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा लूक आणि स्टाइलने ती नेहमी एक नवा ट्रेन्ड सेट करत असते. अनेक तरूणी तिचा स्टायलिश लूक नेहमीच फॉलो करताना दिसून येतात. अनेकदा सोनमचे नवनवीन लूक्सचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. यावेळी सोनमचा लेडी बॉस लूक व्हायरल होत आहे. सोनमच्या या फोटोनां चाहत्यांची पसंतीही मिळत आहे. 

पाहूयात सोनमच्या लेडी बॉस लूकचे फोटो... 

सोनम कपूरने ब्लॅक-3 पीस पॅन्ट सूट वेअर केला आहे. ब्लेजर शॉर्ट असून त्यामुळे तिचा हा लूक कूल दिसत आहे. 

सोनमच्या हेअर स्टाइलबाबत बोलायचे झाले तर तिने सोबर स्टाइलमध्ये आपल्या केसांना परफेक्ट लूक दिला आहे. 

सोनमचा हा कॉलर बो अत्यंत ट्रेन्डी आणि नवीन आहे. गर्लिश लूकसाठी ही स्टाइल बेस्ट आहे. 

फुटवेअरबाबत बोलायचे झाले तर तिने स्टेलोटो-पंप हिल्स वेअर केल्या आहेत. या हिल्स तिची हाइट फ्लॉन्ट करण्यासाठी मदत करत आहेत. 

सोनम आपल्या लूकला एका स्टेटमेंट पर्ससोबत कम्पलीट करताना दिसून आली. तिची ही बॅग फार स्टायलिश आहे. 

इअररिंग्सबाबत बोलायचे झाले तर सोनमने 8 शेपमध्ये गोल्ड स्टड वेअर केले आहेत. 

सोनमचा हा लूक चाहत्यांना फार आवडत आहे. अतरंगी फॅशन सेन्स करण्यासाठी ओळखली जाणारी सोनम यावेळी एलिगंट आणि सोबर लूकमध्ये दिसून आली. सोनमने खूप रिंग्स आणि घड्याळं वेअर केली आहेत. त्यामुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसत आहे.

पाहूयात सोनम कपूरचे आणखी काही क्लासी फोटो :  

Web Title: Sonam s boss lady look went viral see pics on her instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.