चिरतरुण दिसण्यासाठी सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 17:35 IST2016-05-04T12:00:42+5:302016-05-04T17:35:40+5:30

शरीर आणि मन दोन्हीही सुंदर आणि तरुण राहतील.

Simple solution to look crunchy | चिरतरुण दिसण्यासाठी सोपे उपाय

चिरतरुण दिसण्यासाठी सोपे उपाय

ong>जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर तुम्हाला वृद्धत्व नक्कीच उशिरा येईल. यात योग, ध्यान, दीर्घ श्वास करणे अत्यंत उपयोगी आहे.

यामुळे रोजचा तणावही कमी होतो आणि मनही फ्रेश राहते. काही अशा खास पयार्यांची लिस्ट आपणास देत आहोत ज्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही सुंदर आणि तरुण राहतील.

►  शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी धार्मिक दिनचयेर्चे पालन करा. योग्य प्रमाणात झोप घ्या, योग्य पोषक आहार जसे की, फळे-पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा.

►  भरपूर पाणी प्या. यामुळे आपल्या शरीरातील डिहायड्रेशन दूर होते आणि त्वचा कायम मॉश्चराईज राहते.

►  रोज काही ठराविक अंतर चाला. यामुळे शरीर फिट राहते आणि आजारही दूर राहतात.

►  योग्य अन्न आणि चांगली झोपच वाढत्या वयाला दूर ठेवण्याचा योग्य मंत्र आहे. 

Web Title: Simple solution to look crunchy