शुमर-सेरेना विल्यम्सची अर्धनग्न छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:56 IST2016-01-16T01:11:51+5:302016-02-05T14:56:11+5:30
येत्या वर्षासाठीच्या जगप्रसिद्ध पिरेली कॅलेंडरसाठी नग्न मॉडेलची छायाचित्रे घेण्यात येणार नाहीत.

शुमर-सेरेना विल्यम्सची अर्धनग्न छायाचित्रे
य त्या वर्षासाठीच्या जगप्रसिद्ध पिरेली कॅलेंडरसाठी नग्न मॉडेलची छायाचित्रे घेण्यात येणार नाहीत. या कॅलेंडरसाठी फोटोशूट करणारी छायाचित्रकार अँनी लेबोविट्झनं तसा निर्णय घेतलाय. परंतु विनोदी अभिनेत्री अँमी शुमर आणि टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांची अर्धनग्न छायाचित्रे या कॅलेंडरसाठी घेण्यात आली आहेत. प्रसिद्ध मॉडलची तोकड्या वस्त्रांतील किंवा नग्न छायाचित्रे घेण्याऐवजी लेबोविट्झनं विविध क्षेत्र गाजवणार्या यशस्वी स्त्रियांची छायाचित्रे घेण्याचं ठरवलंय. यापैकी बहुतेक जणींची छायाचित्रे पूर्ण वस्त्रांत आहेत. सोमवारी हे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आलं. त्यात गायिका पॅटी स्मिथ, कलाकार योको ओनो, चित्रपट निमार्ती कॅथलीन केनेडी, दिग्दर्शिका अँवा डुव्हर्ने आदी यशस्वी स्त्रिया या कॅलेंडरवर झळकणार आहेत.