श्रद्धा - मयांकचा नवा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:38 IST2016-01-16T01:19:59+5:302016-02-12T01:38:23+5:30

अलीकडे ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात 'स्कीन फिट'ची फॅशन जोरात असताना श्रद्धा निगम आणि मयांक आनंद या जोडीने मात्र वेगळा ट्रेंड चालवला आहे. त्यांनी भारतीयांच्या शरीराची ठेवण ध्यानात घेत सामान्य व्यक्तींसाठी कपडे डिझाईन केले आहेत

Shradha - Mayank's new experiment | श्रद्धा - मयांकचा नवा प्रयोग

श्रद्धा - मयांकचा नवा प्रयोग

िनयाच्या क्षेत्रातून या क्षेत्राकडे वळलेल्या श्रद्धा आणि मयांक यांनी 'भारतीयांनी भारतीय पोशाखच वापरावेत,' असे आवाहन केले आहे. त्यांच्याशी झालेली चर्चा अशी..
तुमच्या शोमध्ये कधीही मोठी सेलिब्रिटी दिसत नाही. असे का?

श्रद्धा : आम्ही सामान्य माणसाचा विचार करून कपडे डिझाईन करतो. अशा कलेक्शनला सेलिब्रिटीकडून योग्य न्याय मिळू शकणार नाही, हे आम्ही जाणतो. खादी, सिल्क यांसारखे भारतीय फॅ ब्रिक आमच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत, हे काय कमी आहे?
भारतीय वस्त्रोद्योगाला उतरती कळा लागण्याचे कारण काय?

cnxoldfiles/strong> हातमागावर विणलेल्या कपड्यांमध्ये सुक्ष्म त्रुटी असते. हे पाहून ग्राहक असे कापड नाकारतो वा ते कापड कमी किमतीत मागतो. दुसरीकडे हातामागावर विणलेले वस्त्र आणि डिझाईन बरेचदा महागडी असते. चीनसारख्या मार्केटसोबत स्पर्धा करताना र्मयादा येतात. आपल्याकडे विणकर पुरेशे शिक्षित नसल्याचा परिणामही व्यवसायावर होतो. या सर्वांचा फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसतो.

Web Title: Shradha - Mayank's new experiment