​आॅस्ट्रेलियात सापडला दुर्मिळात दुर्मिळ हिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 19:52 IST2016-05-03T14:22:16+5:302016-05-03T19:52:16+5:30

अत्यंत दुर्मिळ प्रकारचा जांभळ्या रंगाचा हिरा आॅस्ट्रेलियाच्या सदूर अर्गेएल खाणीमध्ये सापडला आहे.

Rare rarely found in Australia | ​आॅस्ट्रेलियात सापडला दुर्मिळात दुर्मिळ हिरा

​आॅस्ट्रेलियात सापडला दुर्मिळात दुर्मिळ हिरा

्यंत दुर्मिळ प्रकारचा जांभळ्या रंगाचा हिरा आॅस्ट्रेलियाच्या सदूर अर्गेएल खाणीमध्ये सापडला आहे. अशाप्रकारचा तो जगातील सर्वात मोठा हिरा आहे.

रिओ टिन्टोच्या वार्षिक ‘पिंक डायमंड शोकेस’मध्ये तो प्रमुख आकर्षण असणार अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

 जेव्हा सापडला तेव्हा हा हिरा 9.17 कॅरेटचा होता. जगातील एकूण गुलाबी आणि लाल  हिऱ्यापैकी सुमारे 90 टक्के हीरे एकट्या अर्गेएल खाणीमध्ये सापडतात. अनेक आठवड्यांच्या मेहनतीनंतर त्याला 2.83 कॅरेटच्या अंडाकृती हिऱ्याचे स्वरूप देण्यात आले.

अर्गेएल व्हायलेट नावाचा हा हिरा अत्यंत दुर्मिळ आहे. त्याच्या अप्रतिम सौंदर्य, आकार आणि उगमस्थानासाठी तो ओळखला जातो, अशी माहिती रिओ टिन्टो डायमंड्स कंपनीचे विक्री विभागाचे सरव्यवस्थापक पॅट्रिक कोपेन्स यांनी दिली.

cnxoldfiles/span> अशा प्रकारचा जांभळा रंग कसा प्राप्त झाला याबाबत मतेभेद आहेत. मागच्या 32 वर्षांमध्ये जांभळ्या रंगाचे हिरे केवळ 12 कॅरेटस हिऱ्याचे उत्पादन झाले आहे.

Web Title: Rare rarely found in Australia