शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

पॉल बेटी ठरले पहिले अमेरिकन ‘बुकर’ लेखक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 18:08 IST

त्याच्या ‘द सेलआॅऊट’ कादंबरीला यंदाच्या ‘मॅन बुकर प्राईज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

इंग्रजी साहित्यातील अत्यंत मानाचा असा ‘मॅन बुकर प्राईज’ मिळवणारे पॉल बेटी हे पहिले अमेरिकन लेखक ठरले आहेत. अमेरिकेतील वर्णभेदाच्या राजकारणारावर विनोदीशैलीत ताशेरे ओढणाऱ्या त्याच्या ‘द सेलआॅऊट’ कादंबरीला यंदाच्या ‘मॅन बुकर प्राईज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.लॉस एंजलिस येथे जन्मलेल्या या ५४ वर्षीय लेखकाच्या कादंबरीचे मुख्य पात्र त्याची आफ्रिकन-अमेरिकन ओळख ठासून दर्शविण्यासाठी पुन्हा एकदा गुलामगिरी व भेदभावाची संस्कृती प्रस्थापित करू पाहते. बेटी यांच्या मते, सर्वच वाचकांना ही कादंबरी पचनी पडेलच असे नाही.यंदाच्या बुकर प्राईजच्या प्रमुख परीक्षक अमांडा फोरमॅन मात्र म्हणतात, ‘साहित्य केवळ वाचकाचे सांत्वन करणारे नसावे. सत्य हे कटू असते आणि ते तसेच स्वीकारले पाहिजे. ‘द सेलआऊट’ कादंबरी हे त्याचेच उदाहरण आहे. म्हणून तर तिची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगात आज जे वर्णभेदी वातावरण आहे त्यानुसार ही कादंबरी फार समयसुचक आहे.’बेटी यांची लेखनशैली मार्क ट्वेन आणि जॉनथन स्विफ्ट यांच्या तोडीसतोड असल्याचे परीक्षकांनी नमुद केले. लंडनच्या गिल्डहॉल येथे पार पडलेल्या ब्लॅक-टाय डिनर कार्यक्रमात ५० हजार पौंड रक मेच्या या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रकाशक ‘वनवर्ल्ड’साठी हा पोठोपाठ दुसरा ‘बुकर’ ठरला. गत वर्षी विजेते ठरलेले मार्लन जेम्स लिखित ‘अ ब्रिफ हिस्ट्री आॅफ सेव्हन किलिंग्स’ हे पुस्तकदेखील त्यांनीच प्रकाशित केले होते.पुरस्कार स्वीकारताना भावनावश झालेले बेटी म्हणाले की, ‘मला फार ड्रमॅटिक  व्हायचे नाहीए परंतु मला झालेला आनंद मी लपवूसुद्धा शकत नाही. लेखनामुळे माझे जीवन साकारले आणि आयुष्य सावरले.’