'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:17 IST2018-11-26T20:15:39+5:302018-11-26T20:17:32+5:30
2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर.

'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK
2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. एकापाठोपाठ एक अशा तगड्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याच्या चर्चा जेवढ्या रंगल्या त्यापेक्षा जास्त त्यांच्या लग्नामधील ब्राइडल लूकबाबत फॅन्समध्ये फार चर्चा होत होत्या. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्राइडल ड्रेसच्या किमतींबाबत. पण जरा सांभाळून हा.... कारण या किमती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल...
बॉलिवूडच्या मस्तानीचा नववधू साज
दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा दोन पद्धतींनी पार पडला. एक म्हणजे कोंकणी पद्धत आणि दूसरी म्हणजे सिंधी पद्धत. आपल्या सिंधी पद्धतीने होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी दीपिकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेला होता. या लेहेंग्याची किंमत 9 लाख रूपये होती. तसेच यावेळी दीपिकाने जे दागिने परिधान केले होते त्यांची किंमत 1 कोटी रूपयांपेक्षाही जास्त होती. दीपिकाचं मंगळसुत्र 20 लाख रूपयांचं होतं.
फॅशन क्वीन सोनम कपूरचा ब्राइडल लेहेंगा
मे 2018मध्ये आनंद आहूजासोबत मुंबईमध्ये आपली लग्नगाठ बांधणाऱ्या सोनम कपूरच्या लग्नाचा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अनुराधा वकीलने डिझाइन केला होता. सोनमच्या लाल रंगाच्या या लेहेंग्यावर गोल्डन कलरने सुंदर वर्क केलं होतं. या लेहेंग्याची किंमत 70 ते 90 लाख रूपये होती.
अनुष्काचा पिंक लेहेंगा
दीपिका आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अनेक गोष्टी कॉमन होत्या. एकतर दोघींनीही इटलीमध्ये लग्न केलं आणि दोघींनीही आपल्या लग्नामध्ये परिधान केलेले ड्रेस प्रसिद्ध डिझायनर सब्या साची यांनी डिझाइन केले होते. अनुष्काच्या पिंक कलरच्या ब्राइडल लेहेंग्याची किंमत 30 लाख रूपये होती.
योगा क्विनचा ब्राइडल लूक
बॉलिवूडची सर्वात फिट आणि योगा क्विन शिल्पा शेट्टीने बिजनेसमन राज कुंद्रासोबत आपली लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नासाठी शिल्पाने प्रसिद्ध डिझायनर तरुण तहिलियानी यांची निवड केली होती. शिल्पाने आपल्या लग्नात लेहेंगा नाही तर साडी नेसली होती. ज्यावर 8 हाजारपेक्षाही जास्त Swarovski क्रिस्टल्सने वर्क करण्यात आलं होतं. या साडीची किंमत 50 लाख रूपये होती.
ऐश्वर्याचा गोल्डन आउटफिट
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली. परंतु हे कपल आजही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय कपल आहे. ऐश्वर्याने आपलं ब्राइडल आउटफिट प्रसिद्ध डिझायनर नीता लूलाकडून डिझाइन करून घेतलं होतं. ऐश्वर्याच्या या आउटफिटची किंमत 75 लाख रूपये होती.