लियोचे नवे अफेयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 21:30 IST2016-04-10T04:30:38+5:302016-04-09T21:30:38+5:30

लियो सवयीप्रमाणे पुन्हा एकदा व्हिक्टोरिया सिक्रे ट पिंक मॉडेल चेल्सी वेईमरला डेट करत आहे.

Leo's new affair | लियोचे नवे अफेयर

लियोचे नवे अफेयर

ेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हॉलिवूड सुरपस्टार लिओनार्दाे डिकॅप्रियोला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आॅस्कार पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासह तमाम चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यामुळे लियो आता त्याच्या जुन्या कामांना परत रुजू झाला आहे.

अहं... जुने काम म्हणजे लियोची सुपरमॉडेलल्सना डेट करण्याची सवय. 

अशी चर्चा आहे की, लियो सवयीप्रमाणे पुन्हा एकदा व्हिक्टोरिया सिक्रे ट पिंक मॉडेल चेल्सी वेईमरला डेट करत आहे. नुकतेच दोघांना नोबू मलिबू येथे एकत्र  पाहण्यात आले. लियोच्या लॉस एंजलिस येथीलज घरी काढलेले फोटोदेखील ती शेअर करत आहे.

चेल्सीच्या इन्स्टाग्राम पेजनुसार तिला अ‍ॅब्ज असून चांगले केस तिच्या सौंदर्याचे प्रतिक आहेत. तिला कॉफीसुद्धा आवडते.

डिकॅप्रियोच्या जवळच्या मित्राने मात्र या सगळ्या खोट्या बतावण्या आहेत असे सांगून अफेयरच्या चर्चांना फेटाळून लावले. त्याच्या मते, लियो सध्या कोणाला डेट करत नाहीए. तो तर हल्ली इंडोनेशियात पर्यावरणविषय कार्यांत गुंतलेला आहे.

व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेल्स आणि लियोचे फार जुने संबंध आहेत. बहुधा लियोच्या सर्वात जास्त गर्लफ्रेंड्स या व्हिक्टोरियाज् सिक्रेट मॉडेल्स असतील. त्यामध्ये एव्हा हर्झिगोवा, बार रफएली, अने व्यालितस्याना, एरिन हिथरटन, टोनी गार्न अशी काही नावे घेता येतील.

वाचा : ​लियोच्या मॉडेल गर्लफ्रेंड्स

Web Title: Leo's new affair