शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मुलींची पताका साता समुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:40 IST

भारतीय मुली आता देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील आपल्या कतृत्त्वाचा ठसा उमटवित आहेत

भारतीय मुली आता देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील आपल्या कतृत्त्वाचा ठसा उमटवित आहेत. युद्धक्षेत्रातील भयानता असो किंवा विज्ञानाचे क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी त्यांचे यश देशाचे नाव उज्‍जवल करीत आहेत. या आठवड्यात दोन भारतीय मुलींनी अमेरिकेत मिळविलेले यश सर्वांना उत्साहित करणारे आहे. बेंगलुरूच्या अनिशा आचार्यने आपल्या कौशल्याने आस्करचा सुवर्णवेध साधला आहे तर ओडीशाच्या ललिता श्रीसाई हीने नव्या संशोधनाचा मार्ग प्रशस्त केला आहे. 'ऑस्कर सुवर्ण'वेध बेंगरूलुच्या अनिशा आचार्यने त्याच्या 'डे वन' चित्रपटासाठी विद्यार्थी श्रेणीतला ऑस्कर सुवर्ण पुरस्कार मिळविला आहे. ती सध्या अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट संपादनाची पदव्युत्तर पदवी घेत आहे. 'डे वन' हा 25 मिनिटाचा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2015 च्या विद्यार्थी ऑस्कर पुरस्कारात नॅरेटिव्ह कॅटेगिरीमध्ये तीला हा पुरस्कार मिळाला आहे. अफगान-अमेरिकन महिला जी अमेरिकन सैन्यात इंटरपिटर (अनुवादक) म्हणून काम करत आहे, तिच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अफगानीस्थानमध्येअसताना नायिकेला ा एका गरोदर महिलेच्या मुलाखती दरम्यान तिची पीडा कळते. या महिलेचा नवरा दहशतवादी संघटनेचे काम करतो. बाळंतपणासाठी नायिकेने केलेली मदत हे या चित्रपटाची मुख्य थीम आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हॅन्री ह्युजेस यांनी केले आहे. अनिशाने या चित्रपटाचे संपादन केले आहे. हा अनिशाच्या अभ्यासाचा भाग असला तरी देखील ऑस्कर मिळविणे हा माझा सन्मानच आहे असे तिला वाटते. अनिशा ही प्रसिद्ध लेखक आणि नाटककार दिवंगत सीके नागराजा राव यांची नात आहे.ललिताची गुगल भरारीओडीसातील 13 वर्षीय मुलीने मक्याच्या कणसांपासून जल शुद्धीकरण यंत्र बनविले आहे. गुगल विज्ञान यात्रेत विजेतेपद मिळविल्याने तिच्या संशोधनाचे महत्त्व लक्षात येते. सत्या नडेला असो किंवा सुंदर पिचाई असो भारतीयांनी नेहमीच जागतिक स्तरावर यशस्वीतेची गाथा सादर केली आहे. एका बाजुला जिथे भारतीय मुलांचे किशोरवयीन मुले सेन्सर स्टिकापासून असे काही तरंग निर्माण करीत आहेत की ज्यामुळे कर्णबधिरांना तेल सांडल्यानंतर सुद्धा जाणवेल, आणि आता दूसर्‍या बाजुला ओडिसातल्या या तेरा वर्षीय मुलीने गुगल विज्ञान यात्रेत हा आविष्कार सादर केला आहे.नवव्या इयत्तेतील ललिता श्रीसाई हिने या कॅलिफोर्निया येथे भरलेल्या या यात्रेत नुकतेच कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड हा पुरस्कार नुकताच मिळविला आहे.