दीपिका की प्रियांका; कोणाचा मेहंदीचा लूक होता खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 18:06 IST2018-12-03T18:04:50+5:302018-12-03T18:06:47+5:30

2018 हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचे वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनीआपली लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचाही विवाह सोहळा पार पडला.

deepika or priyanka whose mehendi look was better | दीपिका की प्रियांका; कोणाचा मेहंदीचा लूक होता खास?

दीपिका की प्रियांका; कोणाचा मेहंदीचा लूक होता खास?

2018 हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचे वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनीआपली लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचाही विवाह सोहळा पार पडला. दीपिका आणि रणवीरच्या लग्नसोहळ्यापासून मेहंदी, संगीत अशा सर्व समारंभांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतच. परंतु प्रियांकाच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नसले तरिही संगीत आणि मेहंदीचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करण्यात आले आहेत. अशातच दीपिका आणि प्रियांकाच्या लूक्सबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. 

दीपिकाचा रॉयल अंदाज 

आपल्या मेहंदीसाठी दीपिकाने रॉयल लूक केला असून ती एखाद्या महाराणीप्रमाणे दिसत होती. दीपिकाने पावडर पिंक कलरचा हेव्ही वर्कचा लेहेंगा परिधान केला होता आणि त्याचबरोबर ईयरिंग्स आणि राणी हार परिधान केला होता. 

प्रियांकाचा देसी अंदाज

प्रियांकाने आपल्या मेहंदीसाठी येलो बेस असणारा मल्टी कलरचा लेहेंगा परिधान केला होता. प्रियांकाचा हा लूक प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केला होता. 

मस्तानीचा मस्त लूक 

दीपिकाच्या मेहंदीचा लूक प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची यांनी डिझाइन केला होता. दीपिका आपल्या मेहंदीच्या फंक्शनमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसून आली. दरम्यान दीपिकाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. दोघांचा विवाहसोहळा आधी कोंकणी पद्धतीने त्यानंतर सिंधी पद्धतीवे पार पडला.  

देसी गर्लचा कलरफुल लूक 

मल्टीकलरच्या या लेहेंग्यासोबत प्रियांकाने मांगटीका, हेव्ही नेकलेस आणि केसांमध्ये गजरा माळला होता. या लूकमध्ये प्रियांकाचा लूक ब्राइट आणि कलरफुल दिसत होता. दरम्यान प्रियांकाने हॉलिवुडचा प्रसिद्ध सिंगर निक जोनास याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधली असून दोघांचाही लग्नसोहळा ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. 

Web Title: deepika or priyanka whose mehendi look was better