शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Fact Check: RSS चा पाठिंबा  I.N.D.I.A आघाडीला?... जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 5:48 PM

Fact Check: रा. स्व. संघाला भाजपाची मातृसंस्था मानलं जातं. मात्र, व्हिडीओतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोहन भागवतांच्या नेतृत्वाखालील RSS शी काडीमात्र संबंध नाही.

Claim Review : RSS चा पाठिंबा  I.N.D.I.A आघाडीला?
Claimed By :
Fact Check : चूक

Created By: BoomTranslated By : ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. हा 'मतसंग्राम' जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे सगळेच मार्ग राजकीय पक्ष अवलंबतात. प्रत्येक मत महत्त्वाचं, मोलाचं असतं. त्यासाठीच युती किंवा आघाडीत अधिकाधिक पक्ष जोडण्यााचा प्रयत्न होतो. तसाच, मोठ्या संस्थांचा - संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवरच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) भाजपाविरोधी पक्षांच्या आघाडीला - 'इंडिया'ला पाठिंबा दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, सत्य पडताळणीत हा व्हिडीओ खोटा, दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे. 

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नातं सगळ्यांनाच परिचित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या अनेक नेते तरुणपणी संघ स्वयंसेवक होते. रा. स्व. संघाला भाजपाची मातृसंस्था मानलं जातं. मात्र, व्हिडीओतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोहन भागवतांच्या नेतृत्वाखालील RSS शी काडीमात्र संबंध नाही, अशी बाब समोर आली आहे.

जनार्दन मून यांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ आहे. त्यात भिंतीवर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाचा बॅनर दिसतोय. "लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील 'इंडिया'ला पाठिंबा द्यायचं आम्ही ठरवलं आहे", असं वाक्य मून यांच्या तोंडी आहे. हा व्हिडीओ Rahul Kajal INC (@RahulKajalRG)या 'एक्स' हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, "Big News.. Please make viral this. देशभरात RSS कडून (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) INDIA आघाडीला पाठिंबा. देशभरातील संघींना INDIA आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन. संघ ने भरी हुंकार, उखाड फेंकों मोदी सरकार।" 

'एक्स' पोस्टची लिंक / 'एक्स' पोस्टची अर्काइव्ह लिंक

हाच व्हिडीओ East Bangalore Congress Sevadal (@Sevadaleblr) नामक एक्स हँडलवरूनही पोस्ट केला गेला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये 'देश और संविधान को बचाना है, मोदी को हटाना है : RSS' असा मजकूर आहे. 

'एक्स' पोस्टची लिंक / एक्स' पोस्टची अर्काइव्ह लिंक

'बूम'ने या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा 'इंडिया'ला पाठिंबा जाहीर करणारी RSS वेगळीच संस्था आहे, तिचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयेही संबंध नाही, असं निदर्शनास आलं. व्हिडीओत प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या व्यक्तीचं नाव स्पष्ट दिसतंय. त्यानुसार, जनार्दन मून या नावाने जेव्हा सर्च करण्यात आलं, तेव्हा RSS नावाचीच एक संघटना ते नागपूरमध्ये चालवतात आणि त्यांनी या संघटनेची नोंदणी करण्याचा प्रयत्नही केला होता, अशी बाब समोर आली. 

टाइम्स ऑफ इंडियामध्ये २०१९ साली प्रकाशित झालेल्या एका बातमीने त्याला पुष्टी दिली. आपल्या एनजीओला RSS नाव मिळावं यासाठी मून यांनी केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली होती. 

संपूर्ण बातमी इथे पाहा

याच संदर्भातील एक व्हिडीओ २४ मार्च २०२४ रोजी आवाज इंडिया यू-ट्युब चॅनलने पोस्ट केला होता. त्याचं शीर्षक होतं, "RSS supports Congress, creates uproar across the country | PC of RSS Chief Janardan Moon, Abdul Pasha" त्याच्या कॅप्शनमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, "RSS ने 'इंडिया' आघाडीला समर्थन कसं काय दिलं, असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, देशात दोन RSS आहेत. एक 'ऑनलाइन नोंदणीकृत', ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि दुसरी 'अनोंदणीकृत' - जिचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत. सावध राहा, संभ्रमित होऊ नका."

व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यास, मून यांच्या संघटनेचा लोगो आणि सरसंघचालकांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोगो वेगवेगळे असल्याचंही लक्षात येतं.  

या संदर्भात, 'बूम'ने थेट जनार्दन मून यांना संपर्क साधला असता, मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखालील RSS शी आपल्या संघटनेचा संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

त्याचवेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर वीकली'ने आपल्या उल्लेख एक्स पोस्टमध्ये मून यांच्या संघटनेचा उल्लेख FAKE असा केला आहे.  

'एक्स' पोस्टची लिंक / 'एक्स' पोस्टची अर्काइव्ह लिंक

या संपूर्ण पडताळणीनंतर हे स्पष्ट होतं की, संघाने 'इंडिया' आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याचा एक्स पोस्टमधील दावा खोटा, दिशाभूल करणारा आहे. 

(सदर फॅक्ट चेक 'बूम' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस