शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:00 IST

Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. सध्या एका चित्रपटाचा एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील नऊ प्रांतांपैकी पाच प्रांतांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. एकीकडे ओमायक्रॉन विषाणूची भीती आहे, तर दुसरीकडे यावरील एक चित्रपटही १९६३ मध्ये प्रदर्शिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, याचा एक पोस्टरही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो सध्या सर्वाच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या 'द ओमायक्रॉन व्हेरिअंट' नावाच्या चित्रपटाचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या दिवशी पृथ्वीला स्मशानस्वरूपात बदललं होतं, असंही टॅगलाइन यात देण्यात आली आहे. हा चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा पोस्टर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या महासाथीची दीर्घकाळापासून योजना आखली जात होती असंही म्हटलं होतं. याशिवाय बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीदेखील या चित्रपटाचा व्हायरल पोस्टर शेअर केला होता.  दरम्यान, हा पोस्टर एडिट करून तयार करण्यात आलेला असून मूळ पोस्टर हा १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फेज IV' या चित्रपटाचा आहे. बेकी चीटल या आयरिश दिग्दर्शक आणि लेखकानं केवळ मनोरंजनासाठी हे व्हायरल पोस्टर तयार केलं होतं. तसंच 'द ओमायक्रॉन व्हेरिअंट' अशा नावाचा कोणताही चित्रपट नाही. १ डिसेंबर २०२१ रोजी बेकी चीटलनं हे पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं होतं. तसंच फोटोशॉपचा वापर करून हे तयार केल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, हे गांभीर्यानं घेऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया