शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: संजय राऊतांच्या टॅटूचा व्हायरल झालेला फोटो बनावट; जाणून घ्या सत्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:01 IST

Fact Check - निवडणूक प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर संजय राऊत यांच्या टॅटूचा आक्षेपार्ह फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Claim Review : एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू काढले आहेत आणि त्याच्या खालच्या भागावर संजय राऊत यांचा टॅटू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: FactlyTranslated By: ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात सोशल मीडियात अनेकदा चुकीच्या आणि बनावट गोष्टी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एका कार्यकर्त्याच्या पाठीवर शिवसेना (UBT) नेत्यांचे टॅटू असलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्या व्यक्तीच्या पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू दिसत आहेत, तर संजय राऊत यांचा टॅटू खालच्या बाजूस आक्षेपार्ह पद्धतीने दाखवलेला आहे. हा फोटो खरा आहे की खोटा याची पडताळणी करुया.

Archive Photo 

दावा काय आहे? 

एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू काढले आहेत आणि त्याच्या खालच्या भागावर संजय राऊत यांचा टॅटू असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पडताळणीत काय आढळलं?

हा फोटो बनावट आहे. मूळ फोटोमध्ये रामण्णा जमदार या कार्यकर्त्याने शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपल्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढले. संजय राऊत यांचा टॅटू  या फोटोमध्ये डिजिटलरीत्या एडिट करून जोडण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे.

व्हायरल झालेला फोटो रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासला असता त्याची सत्यता बाहेर आली, सप्टेंबर २०२२ मध्ये अनेक न्यूज पोर्टलने (इथे वाचा आणि इथे वाचा) ही बातमी प्रकाशित केली होती. या फोटोत एक व्यक्ती उद्धव ठाकरे यांना आपली पाठ दाखवत आहे, ज्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू आहेत.

या रिपोर्टनुसार, सोलापूरचे एक बांधकाम कामगार रामण्णा जमादार यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी असलेल्या निष्ठेचे दर्शन घडवण्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यांचे टॅटू आपल्या पाठीवर गोंदवले आहेत. व्हायरल फोटोची मूळ फोटोसोबत तुलना केली असता संजय राऊत यांचा टॅटू बनावट एडिट केलेला असल्याचे दिसून येते.

याशिवाय, TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत, रामण्णाने आपल्या पाठीवरील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे दोन टॅटू दाखवले. हे दृश्ये रामण्णाने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर देखील शेअर केले होते.

निष्कर्ष काय?

थोडक्यात, हा एक एडिट केलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. ज्यात एका व्यक्तीने आपल्या मागील भागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदवल्याचा चुकीचा दावा केला जात आहे. 

(सदर फॅक्ट चेक Factly या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल