पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 13:33 IST2019-09-01T13:23:56+5:302019-09-01T13:33:12+5:30
देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस
मुंबई - देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक कामगिरीबाबतच्या आढाव्यात महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जानेवारी २०१९ मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या गुणवत्ता तपासणीचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करण्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले होते.
राष्ट्रीय हरित लवादाच्या या आदेशान्वये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाची गुणवत्ता तपासणी एका विशेष समितीमार्फत मे २०१९ मध्ये केली होती. यामध्ये देशभरातील सर्व प्रदूषण नियंत्रण मंडळे/प्रदूषण नियंत्रण समित्या यांच्या कामकाजाची तपासणी विविध विषयांच्या अनुषंगाने करण्यात आली होती.
यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्वाधिक ८२.९३ इतके गुण मिळाले असून हे मंडळ प्रथम स्थानावर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता पडताळणीत पर्यावरणविषयक गुणवत्ता मापन, कायद्याची अंमलबजावणी आणि दैनंदिन व प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती (डेटा) व्यवस्थापन व लोकसंपर्क, निर्णय क्षमता व संशोधन, प्रगती व प्रशिक्षण या बाबींचा समावेश करण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पर्यावरण कामगिरीत महाराष्ट्र सरस pic.twitter.com/mrw64ZR8Gd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 1, 2019
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी मंडळाने पर्यावरणविषयक कायद्याच्या अंमलबजावणीची दाखवलेली
तत्परता व धोरणात्मक निर्णय यामुळे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता पारदर्शी कामकाजाच्या माध्यमातून वेळेत संमतीपत्राचा निपटारा, प्लॅस्टिकबंदी, हवा गुणवत्ता
तपासणी, जलप्रदूषण नियंत्रणाकरिता उचललेली पावले तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांतून ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.
संगणकीय प्रणालीत केला बदल
मंडळाने डिजिटायझेशन, संगणकीय प्रणालीच्या ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये बदल, ईझ ऑफ डुइंग बिझनेस या माध्यमातून औद्योगिक आस्थापनांना करावयाच्या अर्जांची संख्या कमी करण्यावर भर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजाशी संबंधित सर्व आस्थापनांशी सातत्याने ठेवलेला संवाद आणि मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांची सकारात्मक मानसिकता यामुळे प्रथम स्थानाची गुणवत्ता प्राप्त झाली आहे.