"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:19 IST2025-10-01T15:18:48+5:302025-10-01T15:19:13+5:30
लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वतीचे धक्कादायक चॅट समोर आले आहे.

"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
Chaitanyananda Saraswati Case: लैंगिक छळाच्या आरोपानंतर दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्चचे व्यवस्थापक स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी, काही विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यनंद सरस्वती, ज्यांना पार्थ सारथी म्हणूनही ओळखले जाते त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपांनंतर शृंगेरी खंडपीठ, पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत १७ विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळ, धमकावणे आणि जबरदस्तीने स्पर्श करणे असे आरोप केले. त्यानंतर आता चैतन्यनंद सरस्वतीचा नवा कारनामा समोर आला आहे.
स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर छेडछाड आणि धमकी देण्यासारखे अनेक गंभीर आरोप आहेत. यातील सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे त्यांनी एका मुलीला दुबईतील शेखला विकण्याचा प्रयत्न केला. स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांनी स्वतःला देव म्हणून सर्वांसमोर आणलं होतं. पण त्याची काळी बाजू समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. स्वामी चैतन्यनंद यांच्या लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी केली, ज्यामध्ये मुलींसोबत असंख्य अश्लील चॅट केल्याचे उघड झाले.
लीक झालेल्या चॅट स्वामी चैतन्यनंद एका विद्यार्थीनीला, तुझी ड्युटी पूर्ण झाली का? असं विचारलं. त्यावर विद्यार्थिनीने, मी माझ्या शिफ्टसाठी जातेय असं म्हटलं. दुसऱ्या एका चॅटमध्ये स्वामीने दुबईच्या शेखचा उल्लेख केला. चैतन्यनंद सरस्वतीने एका पीडितेला दुबईतील एका शेखला सेक्स पार्टनरची गरज आहे. तुझी चांगली मैत्रीण आहे का? असा मेसेज केला. त्यावर पीडितेने
माझे कोणीच नाही, असं म्हटलं. त्यावर स्वामीने, हे कसे शक्य आहे? असा सवाल केला. पीडितीने कोणीच नाही म्हटल्यावर स्वामीने पुन्हा तुझी वर्गमैत्रिण किंवा ज्युनियर आहे? असं विचारलं.
दरम्यान, पोलीस तपासात स्वामी चैतन्यनंद ने तरुणींना 'बेबी', 'आय लव्ह यू' आणि 'आय अॅडॉर यू' असे मेसेज पाठवले होते आणि त्यांच्या दिसण्याबद्दल टिप्पण्या केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या केसांचे आणि कपड्यांचे कौतुक केले होते.