शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

SSC Result Update: दहावीच्या निकालासाठीच्या संकेतस्थळाबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:34 IST

SSC Result Update: माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही

मुंबई - दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. ( Education Minister Varsha Gaikwad Says, The website for the SSC results will be unveiled soon )माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु,दुपारीचे २ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली.परिणामी साईट क्रॅश झाली होती. दरम्या्न, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही साईट पूर्ववत झाली नव्हती. 

त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून केल्या जात आहेत. याबाबत राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता; येत्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल.त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी एमकेसीएल सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाइलवर एसएमच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील १६ लाखाहून अधिक  विद्यार्थ्यांनी या संकेतस्थलळा भेट दिल्याने त्यावर ताण आला. 

राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालVarsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षण