अकरावी प्रवेशात यंदापासून मुलींसाठी स्वतंत्र फेरी; शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय केला जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:36 IST2026-04-28T07:36:03+5:302026-04-28T07:36:29+5:30
प्रत्येक विद्यार्थ्यास एकाच अर्जाद्वारे राज्यातील कोणत्याही शाळेची निवड करता येईल.

अकरावी प्रवेशात यंदापासून मुलींसाठी स्वतंत्र फेरी; शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय केला जारी
मुंबई - यंदापासून राज्यातील सर्व अकरावी प्रवेश ऑनलाइन व गुणवत्तेनुसार होणार असून, मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरीची तरतूद करण्यात आली आहे. १५ जुलैपासून ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी जारी केला आहे.
नवीन प्रक्रियेनुसार, ३ नियमित फेऱ्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी होईल आणि त्यापुढे केवळ मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित केली जाईल. गुणवत्ता निश्चित करताना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च पाच विषयांचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास एकाच अर्जाद्वारे राज्यातील कोणत्याही शाळेची निवड करता येईल.
नवीन नियमानुसार...
शाळा व महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे : १० एप्रिल ते २५ एप्रिल
माहितीचे प्रमाणीकरण: २६ एप्रिल ते ५ मे
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार
करणे : ५ मे ते १४ मे