शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

School Fee: कोरोना काळात खासगी शाळा वार्षिक फी आकारू शकतात का? दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:00 IST

School Fee waiver decision rejected by Delhi High Court: गेल्या सव्वा वर्षापासून मुले घरातूनच शिक्षण घेत आहेत. यामुळे शाळांनी त्यांची नेहमीप्रमाणे फी आकारणी करण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थी घरी असताना देखील स्कूल व्हॅन चार्ज, गणवेश आणि अन्य चार्जेस आकारले होते.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) शिक्षण संचालनलयाचे आदेश रद्द केले आहेत. यामध्ये संचालनलयाने खासगी शाळांना (Private School) लॉकडाऊन संपल्य़ानंतरही वार्षिक फी (Private School Annual fee) आणि डेव्हलपमेंट चार्ज पालकांकडून घेऊ शकत नाही असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने हे आदेश रद्द केले आहेत. (Delhi High Court on Monday said the private unaided schools in the national capital can collect annual school fees from their students.)

गेल्या सव्वा वर्षापासून मुले घरातूनच शिक्षण घेत आहेत. यामुळे शाळांनी त्यांची नेहमीप्रमाणे फी आकरणी करण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थी घरी असताना देखील स्कूल व्हॅन चार्ज, गणवेश आणि अन्य चार्जेस आकारले होते. तसेच फी भरण्याची सक्तीही केली जात होती. यामुळे एकीकडे कोरोना मुळे उत्पन्न बुडालेले असताना शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये रोष पसरला होता. यामुळे दिल्लीच्या शिक्षण विभागाने शाळांना वार्षिक फीमध्ये अनावश्यक पैसे वसूल करण्यास मनाई केली होती. याविरोधात शाळांची संघटना दिल्ली उच्च न्यायालयात गेली होती.

 या याचिकेवर उच्च न्यायालयाने शिक्षण संचालनालयाला असा कोणताही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. शाळांना ते अनंत काळासाठी फी वसुली करण्यास मनाई करू शकत नाहीत. असे केल्यास शाळांसोबत पक्षपातीपणा केल्यासारखे होईल आणि त्यांच्या कामकाजात फुकटचे अडथळे उत्पन्न होण्याची शक्यता आहे, असे म्हटलेय शिक्षण संचालनालयाच्या गेल्या वर्षी 10 एप्रिल  आणि 28 ऑगस्टला जारी केलेल्या आदेशांमधील फी संबंधी भाग बेकायदा असल्याचे म्हटले आहे. शाळांना अशी फी घेण्यापासून रोखणे म्हणजे डीएसई कायद्यानुसार नियमांच्या विरोधात आहे. याचबरोबर उच्च न्यायालयाने शाळांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय न आणण्यासाठी काही निर्देशही दिले आहेत. या निर्देशांनुसारच शाळा फी वसुली करू शकणार आहेत. 

काय आहेत निर्देश...शाळा त्यांची वार्षिक फी घेऊ शकतात मात्र त्यामध्ये 15 टक्क्यांची सूट देण्यात यावी. ही सूट विद्यार्थी कोरोनामुळे वापरू शकत नसलेल्या सुविधांवर असावी. 10 जून 2020 पासून राहिलेलेी फी सहा हप्त्यांमध्ये स्वीकारावी. एकदम फी भरण्याची सक्ती करू नये.  

टॅग्स :SchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालय