शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शैक्षणिक संस्थांना लागले विद्यापीठाचे वेध; आता नको अनुदान आणि सरकारी जोखडही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:53 IST

सरकारने दिलेल्या जमिनी, अनुदानावर या संस्था/महाविद्यालयांचा ब्रँड तयार झालेला असताना त्यांना लगेच खासगी विद्यापीठ स्थापन करण्याची अनुमती दिली जाणार नाही, अशी भूमिका विभागाने घेतली आहे.

मुंबई - राज्य सरकारच्या जमिनी नाममात्र दराने घेऊन संस्थांनी महाविद्यालये उभी केली, पुढे चार-पाच दशके सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदानही घेतले, पण आता त्याच संस्थांनी अनुदान नको, आम्हाला महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात संस्थेचे रूपांतर करू द्या, असा आग्रह उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे धरला आहे. त्यावर आता विभागाने सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. 

सरकारने दिलेल्या जमिनी, अनुदानावर या संस्था/महाविद्यालयांचा ब्रँड तयार झालेला असताना त्यांना लगेच खासगी विद्यापीठ स्थापन करण्याची अनुमती दिली जाणार नाही, अशी भूमिका विभागाने घेतली आहे. अशी विद्यापीठे उभारली गेली तर शिक्षण महाग होईल आणि त्याचा भुर्दंड पालकांवर बसेल, असे विभागाचे म्हणणे असून खासगी विद्यापीठासाठी परवानगी द्यायची तर त्याचे धोरण काय असावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

समिती हे करणार...अनुदानित महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी आवश्यक किमान शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि संशोधन निकष ठरविणेशासनाने दिलेल्या जमिनीच्या वापराबाबत धोरण निश्चित करणेरूपांतरानंतर मिळणाऱ्या वेतन, अनुदान आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत स्पष्टता आणणेशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संमती आणि सेवा अटींचे संरक्षण, शुल्क नियंत्रणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणेही महाविद्यालये आणि ते घेेत असलेले अनुदान कायम ठेवावे आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त जमिनींवर खासगी विद्यापीठ उभारावे, असा प्रस्ताव विभागाकडून दिला जाऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Private colleges seek university status, want freedom from government aid.

Web Summary : Private colleges in Maharashtra, seeking autonomy, want to convert into private universities, foregoing government grants. The government is forming a committee to formulate policies regarding land use, fees and employee protection during this transition.