शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 5:55 AM

महापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव.

ठळक मुद्देमहापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयासाठी सोमवारी शिक्षण विभागाकडून आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

मुंबईतील शाळा सुरू करण्याआधी महापालिका शिक्षण विभागाकडून आवश्यक एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. २४ वॉर्डातील शाळांचे विभागीय सहायक आयुक्तांच्या मदतीने निर्जंतुकीकरण, मुलांना देण्यात येणाऱ्या मास्कची खरेदी, पालकांकडून घेण्यात येणारी संमती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण याची पूर्वतयारी झाल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबईतील  शाळांना लागू असल्याने आयुक्त शाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिक्षकांचे लसीकरण मुंबई महापालिका शाळांतील जवळपास ७३ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालीच तर तोपर्यंत प्रामुख्याने ८ वी ते १० वी म्हणजेच माध्यमिकच्या शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती तडवी यांनी दिली. शाळांच्या निर्जंतुकीकरणाचे कामही लगेच होईल अशी तयारी त्यांनी दर्शविली आहे. विद्यार्थीसंख्या पाहून वर्ग एकदिवसाआड भरवायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

  • महापालिका शिक्षण विभागाकडून पालकांच्या संमतीपत्राचा नमुना बनवून घेण्यात आला असून पालकांनी हे संमतीपत्र दिले तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत. शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे पालक अजूनही धास्तावलेले असल्याने उपस्थितीची जबरदस्ती मुलांवर करता येणार नाही. 
  • ज्या विद्यार्थ्यांना यापुढेही काही दिवस आपले ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करता येणार असल्याचे तडवी यांनी सांगितले.
टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसTeacherशिक्षकMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका