शाळकरी विद्यार्थ्यांना ISRO मध्ये काम करण्याची संधी; 27 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:33 IST2026-02-24T17:33:19+5:302026-02-24T17:33:59+5:30

जाणून घ्या पात्रता...

Opportunity for school students to work in ISRO; Apply by February 27 | शाळकरी विद्यार्थ्यांना ISRO मध्ये काम करण्याची संधी; 27 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज...

शाळकरी विद्यार्थ्यांना ISRO मध्ये काम करण्याची संधी; 27 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज...

अंतराळ, रॉकेट आणि विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशाची अंतराळ संस्था इस्रो (ISRO) ने Young Scientists Programme – YUVIKA 2026 सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबद्दल उत्सुकता निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

युविका (YUVIKA) म्हणजे काय?

YUVIKA हा शालेय विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेला एक शैक्षणिक कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष वैज्ञानिक वातावरणाशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या दरम्यान विद्यार्थी इस्रोच्या विविध केंद्रांना भेट देतील, आधुनिक प्रयोगशाळा पाहतील आणि थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधू शकतील. यामुळे अंतराळ मोहिमा कशा राबवल्या जातात आणि स्पेस टेक्नॉलॉजी कशी कार्य करते, हे समजून घेण्यास मदत होईल.

कोण अर्ज करू शकतो?

1 जानेवारी 2026 पर्यंत नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.

अर्जदार विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया कशी असेल?

विद्यार्थ्यांची निवड विविध निकषांच्या आधारे केली जाईल. यात, आठवीच्या परीक्षेतील गुणांना 50% वेटेज अन् ऑनलाइन क्विझसाठी 10% गुण गरजेचे असतील. विज्ञान प्रदर्शन, ऑलिम्पियाड, क्रीडा स्पर्धा, NCC / NSS सारख्या उपक्रमांमध्ये सहभागासाठी अतिरिक्त गुण असतील. याशिवाय, पंचायत क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना 15% अतिरिक्त वेटेज असेल. 

विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा मिळणार?

इस्रोच्या विविध केंद्रांना भेट देण्याची संधी, शास्त्रज्ञांशी थेट संवाद, प्रयोगशाळांतील प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची सुविधा, अंतराळ विज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि प्रवासाची संपूर्ण व्यवस्था इस्रोतर्फे करण्यात येणार असून, कोणताही आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येणार नाही.

अर्ज कसा कराल?

अधिकृत वेबसाइट YUVIKA 2026 वर भेट द्या
होमपेजवरील “Apply for YUVIKA Registration” या लिंकवर क्लिक करा
नवीन उमेदवारांनी आधी नोंदणी (Registration) करावी
“Register” पर्याय निवडून आवश्यक माहिती अचूक भरा
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या लॉगिन आयडी व पासवर्डने लॉगिन करा
अर्ज फॉर्म भरून सबमिट करा

विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

युविका 2026 कार्यक्रमामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख मिळणार असून, भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्याच्या दिशेने इस्रोचा हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

Web Title : इसरो ने छात्रों को काम करने का अवसर दिया; 27 फरवरी तक आवेदन करें

Web Summary : इसरो का युविका 2026 कार्यक्रम अंतरिक्ष के प्रति उत्साही 9वीं कक्षा के छात्रों को आमंत्रित करता है। चयनित छात्र इसरो के अनुसंधान का अनुभव करेंगे, प्रयोगशालाओं का दौरा करेंगे और वैज्ञानिकों के साथ बातचीत करेंगे। इसरो आवास, भोजन और यात्रा का खर्च वहन करता है। 27 फरवरी तक आधिकारिक वेबसाइट के माध्यम से आवेदन करें।

Web Title : ISRO offers students opportunity to work; Apply by February 27th

Web Summary : ISRO's YUVIKA 2026 program invites 9th-grade students passionate about space to apply. Selected students will experience ISRO's research, visit labs, and interact with scientists. ISRO covers lodging, food, and travel. Apply via the official website by February 27th.