शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:46 IST

इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकात्मिक स्वरुपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभर केवळ तीन पुस्तके विद्यार्थ्यांना राहणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प प्रयोगीक तत्वावर चिखली तालुक्यात राबविणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्या इयत्तेला जेवढे पाठ्यपुस्तके असतील तेवढे एकत्र करण्यात आले असून, त्याचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पहिल्या तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या भागात पुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे.तिसºया भागात त्यापुढील तीन महिण्यात शिकविला जाणारा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेमध्ये नेण्याची आवश्यकता नाही. प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणाºया या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातून चिखली तालुक्याची निवड करण्यात आली आहे. चिखली तालुक्यात २७२ शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास पहिली ते सातवीपर्यंतचे २३ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पाच दिवसात मिळतील एमात्मिक पुस्तकेएकात्मिक प्रकल्पांतर्गत दिली जाणारी पुस्तकेही येत्या पाच दिवसात उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या दरवर्षीप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीचे मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी तीन पुस्तकांचा उपक्रम आहे, त्याठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिली जणारी मोफत पाठ्यपुस्तके वितरीत होणार नाहीत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा विशेष प्रयोग आहे. ज्यामध्ये वर्षभर फक्त तीन पुस्तके व त्यात सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे मुलांना सर्व पुस्तके शाळेत आणण्याची गरज राहणार नाही. यासाठी चिखली तालुक्याची निवड केली असून या आठवड्यात पुस्तके उपलब्ध होतील.- एजाज खान,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी