लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू हाेत आहेत. यंदाही काॅपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने ठाेस पावले उचलली आहेत. तब्बल ८० टक्के केंद्रे ‘सीसीटीव्ही’ देखरेखेखाली आली आहेत. ही संख्या आणखी वाढेल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंह म्हणाले की राज्यस्तरीय दक्षता समिती काम करत आहे. संवेदनशील केंद्रांवर बारीक लक्ष असेल. नऊ विभागीय कार्यालयांनाही निर्देशित केले असून, सर्व सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे मॉनिटरिंग जिल्हाधिकारी करतील. यावेळी मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, सहसंचालक हारूण अतार उपस्थित होते.
क्रीडा शिक्षकांसाठी पदनिर्मिती
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच खेळ, व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे शाळांना क्रीडाशिक्षक उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४ हजार ८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पदनिर्मिती करण्यात आली आहे. या पदांवर आता शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले.
Web Summary : Maharashtra education department ensures copy-free tenth and twelfth exams with CCTV surveillance at 80% of centers. State-level vigilance committee is working, and district collectors will monitor CCTV control rooms. 4,860 sports teacher positions created in schools to promote holistic student development.
Web Summary : महाराष्ट्र शिक्षा विभाग ने 80% केंद्रों पर सीसीटीवी निगरानी के साथ दसवीं और बारहवीं की परीक्षा को कॉपी-मुक्त सुनिश्चित किया। राज्य स्तरीय सतर्कता समिति काम कर रही है, और जिला कलेक्टर सीसीटीवी नियंत्रण कक्षों की निगरानी करेंगे। छात्रों के समग्र विकास को बढ़ावा देने के लिए स्कूलों में 4,860 खेल शिक्षक पद सृजित किए गए हैं।