Amazon आता देणार JEE चे धडे; ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म केला लाँच
By जयदीप दाभोळकर | Updated: January 13, 2021 19:18 IST2021-01-13T19:15:45+5:302021-01-13T19:18:32+5:30
Amazon नं आजपासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केला नवा प्लॅटफॉर्म

फोटो सौजन्य - रॉयटर्स
Amazon इंडियानं बुधवारी आपली Amazon Acadamy लाँच केली. सध्या याचा फायदा जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन तयारी करून घेतली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. यामध्ये गणित, फिजिक्स आणि कॅमेस्ट्रीसारख्या विषयांसाठी विशेष पद्धतीनं तयार केलेलं साहित्य, लाईव्ह लेक्चर्स आणि विस्तृत माहिती दिली जाणार आहे. Amazon Acadamy चं बीटा वेब व्हर्जन आणि गुगल प्ले स्टोअरवर अॅप मोफत उपलब्ध आहे.
Amazon Acadamy विद्यार्थ्यांसाठी जेईईच्या तयारीसाठी अनेक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या मॉक टेस्ट, १५ हजारांपेक्षा अधिक निवडण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं अशा बाबींचाही समावेश असणार आहे. दरम्यान, शैक्षणिक साहित्य आणि परीक्षांसाठी तयार करण्यात आलेली माहिती देशभरातील तज्ज्ञ मंडळींकडून तयार करून घेण्यात आल्याची माहिती Amazon नं दिली. जेईई सोबतच BITSAT, VITEEE, SRMJEEE आणि MET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. सध्या आणि पुढील काही वर्षांसाठी कंटेंट मोफतच देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं.
मॉक टेस्टमध्ये चॅप्टर टेस्ट, पार्ट टेस्च आणि फुल टेस्ट घेतल्या जाणार आहेत. जेईईच्या पॅटर्नप्रमाणेच या परीक्षा घेतल्या जातील. Amazon Acadamy काही कालावधीनंतर लाईव्ह ऑल इंडिया मॉक टेस्टचही आयोजन करेलं, असंही कंपनीनं म्हटलं आहे.