शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०-१२ वी पास; पण इयत्ता दुसरीचे वाचता येईना, २५ टक्के विद्यार्थ्यांची पीछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 06:13 IST

विशेष म्हणजे या वयोगटातील मुली भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात, तर मुले हे गणित सोडविण्यात पुढे असल्याचे दिसले.

मुंबई : उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या १४ ते १८ वर्षे वयोगटातील ९ ते १२वीच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधील दुसऱ्या वर्गाचे पुस्तक नीट वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव प्रथम फाऊंडेशनच्या 'असर' अहवालातून समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर २०१७ च्या तुलनेत भाषिक व गणितीय कौशल्यातही विद्यार्थ्यांची पीछेहाट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे या वयोगटातील मुली भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात, तर मुले हे गणित सोडविण्यात पुढे असल्याचे दिसले.

दैनंदिन व्यवहारातही  पिछाडीवरदैनंदिन जीवनात लागणारी कौशल्ये तपासण्यासाठी मुलांना मोजपट्टीने एका वस्तूचे माप शून्य आरंभबिंदूपासून काढण्यास सांगण्यात आले. ते ८५ टक्के मुलांना जमले. पट्टी आरंभबिंदूपासून हलविण्यात आली तेव्हा त्या वस्तूचे मोजमाप ४०% मुलांनाच काढता आले. बँक व्यवहारासाठी लागणाऱ्या व्यावहारिक कौशल्यांचाही मुलांकडे अभाव असल्याचे दिसून आले.

पाच कौशल्यांची पाहणीया अहवालाच्या निमित्ताने करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांच्या क्षमता तपासण्यात आल्या. २०१७ साली असरने असा प्रयत्न केला होता. यावेळी प्रादेशिक भाषा, इंग्रजी भाषा वाचन, गणिती, दैनंदिन जीवनात करावी लागणारी वित्तीय गणना, डिजिटल जागरूकता ही पाच  कौशल्ये तपासण्यात आली.मुलांच्या (७०.९ टक्के) तुलनेत मुलींनी (७६ टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी बजावली. तुलनेत मुले अंकगणित आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Schoolशाळा