शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

By सुधीर लंके | Published: October 11, 2023 8:07 AM

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते व अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला. शाळेसमोरील गुटख्याची टपरी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने हलवली. या बाबीचा सूड उगविण्यासाठी टपरीचालकाने थेट सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षक हा गाव सुधारण्यासाठी भूमिका घेणारा हवा. बनगरवाडी कादंबरीने तेच सांगितले. ‘पिंजरा’ चित्रपटातील सुरुवातीचा शिक्षकही असाच गावाला वळण लावणारा दाखविला आहे; पण येथे एक शिक्षक ‘शाळेच्या शंभर यार्ड परिसरात गुटखा, तंबाखू विकता येत नाही’ या सरकारच्या आदेशाचेच पालन करतो म्हणून ‘टार्गेट’ होतो. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण या घटनेचे मूळ महाराष्ट्र समजून घेईल का? आपल्या गावातील शिक्षकावर हल्ला होत असताना अहमदनगर महापालिकेने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  आपली गावे, शहरे यांना वळण लागावे ही गरज मुळात समाजाला वाटते आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सध्या पुणे व नाशिक ही दोन शहरे अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गाजत आहेत. अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता ही बाब समोर आली आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखाने लवकर बेड देत नाहीत; पण ललित पाटीलसाठी तो कायम राखीव होता. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, असे अहवाल डॉक्टरांनी दिले व त्याला महिनोन्महिने ससूनमध्ये ठेवले. यासाठी तो रुग्णालय प्रशासनाला दर दिवशी ७० हजार रुपये मोजत होता, असे धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत; पण एवढे होऊनही ससूनच्या अधिष्ठात्यासह कुणाचेही काही वाकडे झालेले नाही. ललित पाटील व त्याचा भाऊ महागडे अमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या नाशिकमधील कारखान्यावरही या आठवड्यात पोलिसांनी छापे टाकून ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन पावडर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे व नाशिक ही दोन शहरे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. ‘माओ’ म्हणाला होता, ‘कॅच देम यंग’. जगभरातील बहुतांश चळवळींचा व प्रशासनाचाही हा अजेंडा राहिलेला आहे की ‘कॅच देम यंग’. याचा अर्थ तरुणांना जवळ करा; पण अमली पदार्थ विक्रेते व व्यसनांचा व्यापार करणाऱ्यांचाही ‘तरुण’ हाच अजेंडा दिसतो आहे. नाशिकमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाला तरुण महाविद्यालयीन मुले बळी पडत आहेत म्हणून नागरिक चिंतेत आहेत. गत आठवड्यात नाशिक शहरात एक फलकच लागला होता ‘उडता पंजाब, सडता नाशिक’. पंजाबमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले. त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट साकारला. ‘एमडी’ हा अमली पदार्थ सेवन केला की माणूस त्या नशेत धुंद होतो व हवी ती कृत्ये करतो अशी ही झिंग आहे. पुण्यात व नाशिकमध्ये जे रॅकेट समोर आले त्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. राजकारण्यांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त आहे, असा आरोप झाला आहे. गुटखा व मावाबंदी असली तरी या बाबी राजरोस विकल्या जातात. या मागील कारण उघड आहे.

राजकारणासाठी पैसा लागतो. हा पैसा बहुधा समाजाला झिंगवत ठेवतच उभारावा लागतो. समाज झिंगत राहिला तर कदाचित राजकारण निर्धोक चालत असावे. राजकारण तसेच समाज या दोन्ही ठिकाणची मूल्यव्यवस्था हरवली आहे. त्यामुळे ही झिंग आणखी चढत जाणार. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक शाळांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले आहे, ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’. तेच वास्तव असावे. ससून रुग्णालय आरोपीला ड्रग्ज विकण्यासाठी हातभार लावत असेल तर संबंधितांनी नेमकी कुठली पदवी घेतली आहे, हा प्रश्न पडतोच. प्रश्न शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या मूल्यांचाही आहे. या संस्था शाबूत राहिल्या तरच मूल्ये टिकतील, अन्यथा झिंग, हल्ले वाढत जाणार. ‘पिंजरा’ चित्रपटाचा उत्तरार्थ हेच सांगतो.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र