शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
2
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी DCM एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
4
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
5
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
6
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
7
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
8
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
9
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
10
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
11
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
12
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
13
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
14
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
15
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
16
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
17
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
18
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
19
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
20
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पाच जणी...

By admin | Updated: April 10, 2016 02:46 IST

आम्ही पाच जणी... सेल्फी लेडीज किंवा तिशी-चाळीशीत स्वत:ला म्हणवून घ्यायला आवडतं तशा सेल्फी गर्ल... मी, सुकन्या कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, सोनाली पंडित, पूर्वा गोखले...

- शिल्पा नवलकरआम्ही पाच जणी... सेल्फी लेडीज किंवा तिशी-चाळीशीत स्वत:ला म्हणवून घ्यायला आवडतं तशा सेल्फी गर्ल... मी, सुकन्या कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, सोनाली पंडित, पूर्वा गोखले... एकमेकींच्या इतक्या पुरातन मैत्रिणी की, एक सुकन्या सोडली, तर इतरांशी माझी पहिली भेट कुठे आणि कधी झाली, हे मला आठवतही नाही...सेल्फी या माझ्या नाटकाचा झिरो नंबरचा प्रयोग... निमंत्रितांनी तुडुंब भरलेले प्रेक्षागृह... आम्हा पाच जणींच्या मनात धाकधूक, पोटात गोळे वगैरे सगळे साग्रसंगीत... पडदा पडताक्षणी जग जिंकल्याचा आनंद... गेले अनेक महिने आम्ही जो एकच एक ध्यास घेताना, मनासारखं घडेल न घडेल हा विचार न करता झपाटल्यासारखं काम केलं, ते शेवटी साध्य के लंच, ही जाणीव आमच्या डोळ्यावाटे वाहतेय... पडदा भेदून हसत, टाळ्या वाजवत प्रेक्षक आज येतात... आलिंगन देत पाठीवर शाबासकीची थाप देतात... भरभरून कौतुक करतात... नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक नाटक मनापासून आवडल्याची पोचपावती देतात... या वातावरणात आम्ही तरंगत असताना एक स्वत:ला अतिहुशार समजणारा विनोदी नट म्हणतो, ‘नाटक उत्तम आहे. खूप प्रयोग कराल, पण तोपर्यंत तुम्हाला तुमची मैत्री टिकवता येते का, तेवढं बघा म्हणजे झालं’ आणि भविष्य सांगितल्याच्या थाटात तिरकस हसत निघून जातो.त्या क्षणाला माझ्या डोक्याला गेलेली तिडीक मला आज ‘सेल्फी’चे ८६ प्रयोग केल्यावरही स्पष्ट आठवतेय. नाटकाचा पहिला प्रयोग होण्याआधीच हा (म्हणे) आमचा मित्र आमच्या (त्याच्या मते) २०० टक्के होणाऱ्या भांडणाची वाट बघायला लागला होता. ‘पाच बायका एकत्र काम करणार? त्यांचं आपापासात पटणं शक्यच नाही,’ हा ठाम विश्वास कुठून आला असेल त्याच्या मनात? आणि त्याच्यासारख्या इतर अनेकांच्या? आज ही अजित भुरेंचं कौतुक त्याने केलेल्या उत्तम दिग्दर्शनाइतकंच तो पाच अभिनेत्रींना भांडणं होऊ न देता, सांभाळू शकला याबद्दलसुद्धा का होतं? बायकांमधली मैत्री टिकणं ही खंरच इतकी अशक्यप्राय गोष्ट आहे? खरंच आम्ही पाच जणी इतकं जगावेगळं काहीतरी करतोय? आम्ही पाच जणी... सेल्फी लेडीज किंवा तिशी-चाळीशीत स्वत:ला म्हणवून घ्यायला आवडतं तशा सेल्फी गर्ल... मी, सुकन्या कुलकर्णी, ऋतुजा देशमुख, सोनाली पंडित, पूर्वा गोखले... एकमेकींच्या इतक्या पुरातन मैत्रिणी की, एक सुकन्या सोडली, तर इतरांशी माझी पहिली भेट कुठे आणि कधी झाली, हे मला आठवतही नाही... ती आठवण्याची गरजसुद्धा भासत नाही. कारण आता पुढची भेट कधी होईल, याची पाचही जणींना ओढ लागून राहिलेली असते. मैत्री तुटणं तर दूरच, ती प्रयोगाणिक अधिकच मधाळ झाली आहे. आता एकीने सुरू केलेलं वाक्य दुसरी पूर्ण करते, तर कुणा एकीच्या मनात आलेला विचार त्याच क्षणाला वेगळी कुणीतरी मांडून जाते.या पाच जणींची मोट मी नाटक लिहून झाल्यावर बांधली नाही, तर इतर चौघींनी हे नाटक माझ्याकडून लिहून घेतलं. मला लिहिण्यासाठी लॅपटॉप उघडण्याचाही कंटाळा, पण तो आळस झटकायला लावला पूर्वाने. नाटक लिहिते, असं कबूल केल्यावर तिने माझा पिच्छाच पुरवला. रोज सकाळी फोन बघायचे, तेव्हा इतर अनेकांचे गुड मॉर्निंग मेसेजेस असायचे. पूर्वाचा मात्र, ‘किती लिहिलेस?’ असा मेसेज असायचा. एक दिवसाआड आमचा फोन व्हायचा, त्याची सुरुवातही याच प्रश्नाने व्हायची. शेवट मात्र, भरकटत, विषय बदलत कुठल्या कुठे गेलेला असायचा. हे दिवसाआड होणारं फोनवरचं बोलणं, गेली कितीतरी वर्ष माझी आणि पूर्वाची लाइफलाइन राहिलं आहे. शूटिंगला होणारी चिडचिड आम्ही एकमेकींकडे बोलून फ्रेश व्हायचो. घरातलं, घराबाहेरचं, दुखणारं, खुपणारं सगळं आम्ही एकमेकींना सांगायचो. जखमांपासून माणसांपर्यंत सगळं... आम्ही एकत्र केलेली मालिका आता १२-१३ वर्षे जुनी झाली, पण या दरम्यान, पुन्हा एकत्र काम करेपर्यंत आम्ही दोघी एकमेकींचा हात घट्ट धरून राहिलो. आनंद तर वाटून घेतलाच, पण त्रास आणि नैराश्यातही सोबत राहिलो. आमचं एकमेकींवर असलेलं प्रेम सगळ्यांसमोर फारसं उघड करता, झाकून ठेवण्याची आम्हा दोघींनाही सवय आहे. आम्ही सगळ्यांसमोर एकमेकींवर शाब्दिक तलवारी उपसतो. अपमान करतो आणि करवून घेतो. ‘टॉम आणि जेरी’ हे आम्हाला मिळालेलं नाव सार्थ ठरेल, इतकं शब्दांनी बोचकरतो, पण आमच्या नात्यातल्या तिखटपणाने आमच्यातला बंध अजूनच घट्ट होत राहतो.सोनालीच्या आणि माझ्या मैत्रीला इतका इतिहास नाही. असला तर नव्याची नवलाईच आहे. मैत्री जुनी असली, तरी तिचा दाटपणा अलीकडचा, सेल्फी स्पेशल... सोनालीमधली सकारात्मकता मला आश्चर्यचकित करते. तिचा उत्साह, तिची एनर्जी कधीही आमच्यापेक्षा दोन पायऱ्या वर असते. सोनाली मेकअप रूममध्ये, दौऱ्यावर सतत खळखळत असतेच, पण माझा विशेष जीव आहे, तो तिच्यातल्या उत्कृष्ट अभिनेत्रीवर. मीच लिहिलेली वाक्ये जेव्हा सोनाली तिच्या आवाजात समरसून म्हणते, तेव्हा मलाच ती ऐकत राहावीशी वाटतात. वाटतं, प्रत्येक लेखकाला असे अभिनेते मिळायला हवेत की वाटावं, हे असं आणि अगदी अस्संच ऐकण्यासाठी तर मी लिहिलं होतं. हा लेखकांना दुर्मीळ असलेला अनुभव मला आजही सोनाली प्रत्येक प्रयोगाला देते. झोपेवर आणि खाण्यावर प्रचंड प्रेम असलेली ही मुलगी, शरीराने कुठेही असली, तरी मनाने सतत तिच्या घरात, कुटुंबात असते. आपापल्या घरावर प्रेम आपण सगळेच करतो, पण सोनालीकडे तिच्या माणसांना बांधून ठेवण्याची एक विलक्षण हातोटी आहे. मग कधी ती तिच्या भाच्यांची मैत्रीण होते, कधी तिच्या मोठ्या बहिणीची ताई, तर कधी स्वत:च्या आईला तिची आई बनून जपते. सोनालीचे वडील गेले, त्या दिवशी नाटकामुळे त्यांच्या अंतिम दर्शनालाही जाऊ न शकलेली सोनाली, काही तासांतच खणखणीतपणे प्रयोगाला उभी राहिली, तेव्हा आम्हा सगळ्यांपेक्षा खूप मोठी झाली.जगातले सगळे कागद वापरून संपवले, तरी माझं या चौघी मैत्रिणींबद्दल लिहून संपणार नाही. मग सुकन्या आणि ऋतुजासाठी खूप कमी पडणार असला, तरी अजून एक लेख हवाच. तिथेही शब्द कदाचित, आजच्यासारखेच तोकडे पडतील. माझ्यासाठी ‘सेल्फी’ नाटक आणि या चौघी माझा किती मोठा भाग बनून गेल्या आहेत, हे मी पोहोचवू शकणार नाहीच बहुतेक. तरी त्या कळून उमजून घेतील स्वत:हून... कारण ही पाच बोटं वेगवेगळी असली, तरी त्यांची आता ‘सेल्फी’ नावाची मूठ बनलीये... आता आम्ही स्वत:कडे वळून बघतो, तेव्हा एकेकट्या दिसत नाही... दिसतो त्या एकत्र आम्ही पाच जणी...

(लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आहेत.)