शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
3
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
4
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
5
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

भुजबळांसाठी की मतांसाठी?

By किरण अग्रवाल | Published: January 04, 2018 8:16 AM

राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्याने सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वभाविक ठरले आहे.

राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्याने सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वभाविक ठरले आहे. विशेष म्हणजे, वेळोवेळी उघडपणे भुजबळ विरोधाचा उच्चार करणा-या नेत्यांनी या आंदोलनादरम्यान ‘मी भुजबळ’ लिखित टोप्या परिधान केल्याने सोयी वा गरजेनुसार राजकारणातील टोपी बदलाचा प्रत्ययही पुन्हा येऊन गेला आहे.दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ २२ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करीत असून, त्यांच्या सुटकेत अडथळे आणत असल्याचा आरोप केला जात आहे. याच संदर्भाने भुजबळ समर्थकांकडून सरकारच्या निषेधार्थ ठिकठिकाणी जी आंदोलने केली गेलीत त्यात यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सरकार समर्थक आमदारही सहभागी झाल्याने या अराजकीय आंदोलनाला राजकीय छटा प्राप्त होणे क्रमप्राप्त ठरून गेले. एकतर, सरकार भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहे हे लक्षात यायला या पक्षांना व नेत्यांना तब्बल सुमारे दोन वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला, असा अर्थ यातून काढता यावा, किंवा पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने ओबीसी मतांसाठी त्यांना आता भुजबळांची आठवण झाली असे तरी समजता यावे; कारण यापूर्वी ३ आॅक्टोबर २०१६ रोजी याच कारणास्तव भुजबळ समर्थनार्थ नाशकात जो विराट मोर्चा कााढण्यात आला होता, त्यात ‘मी भुजबळ’च्या टोप्या घालून आज आंदोलनात उतरलेल्या जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांपैकी कुणी दिसला नव्हता.भुजबळ मुंबई सोडून नाशिकच्या राजकीय परिघावर अवतरल्याने जी स्थानिक संस्थाने खालसा झाली त्यात देवीदास पिंगळे यांचे नाव आवर्जून घेता येणारे आहे. विधान परिषद तसेच लोकसभेतही नाशिकचे प्रतिनिधित्व केलेल्या पिंगळे यांची जिल्हा बँक व नाशिक बाजार समितीतही मातब्बरी होती. पण, भुजबळ नाशकात आल्याने लोकसभा निवडणुकीसाठीचे ‘तिकीट’ही गेले आणि हळूहळू पक्षातील त्यांचा प्रभावही ओसरला. पुढे पुढे तर पिंगळे हे पक्षाचे नाशिकबाहेरील नेते नाशकात आले तरच तेवढ्यापुरते पक्षाच्या व्यासपीठावर दिसत. त्यामुळे त्यांचा भुजबळांशी मनोमन झालेला दुरावा लपून राहिला नाही. अलीकडेच नासिक सहकारी साखर कारखाना व बाजार समितीतल्या तख्तावरूनही त्यांना पायउतार व्हावे लागले. अशात पिंगळे ‘मी भुजबळ’ची टोपी घालून जसे आंदोलनात उतरलेले दिसले तसे निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर यांचा सहभागही लक्षवेधी ठरला. कारण भुजबळ पक्षांतर्गत राजकारणात ‘मोठ्या साहेबां’च्या म्हणजे शरद पवार यांच्या मर्जीतले म्हणवले जात असताना बनकर हे धाकल्या पातीच्या म्हणजे अजित पवार यांच्या मर्जीतले म्हणवले जातात. त्यातून काही बाबी त्यांना आपसूक चिकटल्या. मध्यंतरी याच बनकर यांच्या पुढाकारातून शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव (ब) येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला होता तेव्हा व्यासपीठावरील फलकावर नेत्यांच्या मालिकेत छगन भुजबळ यांचे छायाचित्र न वापरल्याने गदारोळ झाल्याने अखेर ऐनवेळी फलक बदलण्याची वेळ आली होती. तेच बनकर कालच्या आंदोलनात ‘मी भुजबळ’ची टोपी घातलेले दिसले. नाशकातील राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष गजानन शेलार यांचेही असेच. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शेलार यांनी भुजबळांचे बोट सोडून स्वत:चा स्वतंत्र सवतासुभा स्थापला होता. अजित पवार यांची फूस त्यामागे असल्याचे त्यावेळी बोलले गेले. पण, ते शेलारही ‘मी भुजबळ’ म्हणवताना दिसले. भुजबळ समर्थनाच्या या आंदोलनात राष्ट्रवादीने सक्रियपणे उतरण्याची भूमिका घेतल्याने हे असे घडले असेल, म्हणूनच मग आतापर्यंत याकडे दुर्लक्ष करणा-या राष्ट्रवादीला आताच भुजबळ का आठवले व त्या अनुषंगाने या नेत्यांचे समर्थन खरे मानायचे का, असे प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नयेत. अर्थात पक्षाला व नेत्यांना आज भुजबळांची आठवण झाली असली तरी भुजबळांमागे असलेल्या सामान्यांना व समर्थकांना ती कायम असल्याचे या आंदोलनातूनही दिसून आले. तेव्हा त्यामुळेच राष्ट्रीवादीसह अन्य पक्षीयांनाही या आंदोलनात उतरावे लागले असेल तर काय सांगावे?महत्त्वाचे म्हणजे, पक्षांतर्गत दुराव्यातील नेत्यांची भुजबळ समर्थनातील अशी सहभागीता एकीकडे दिसून येताना व त्यात मालेगावचे विद्यमान आमदार आसिफ शेख, चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल, नांदगावचे अनिल आहेर या काँग्रेसच्या नेत्यांचीही भर पडली असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार अपूर्व हिरे यांचीही मालेगावातील आंदोलनात सक्रियता दिसून आल्याने चर्चेचा फुगा अधिक उंचावून गेला आहे. हिरे हे भाजपा समर्थक आहेत म्हणून हे आश्चर्य नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळ यांना नेटाने व उघडपणे कडवा विरोध करणारे दमदार नेतृत्व म्हणून आजवर त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. मध्यंतरी त्यांनी भुजबळ यांची तुरुंगातही भेट घेतली होती. त्यातून त्यांच्यातील वाढत्या सलगीची जी चर्चा घडून आली, तिला या टोपी बदलाने बळकटीच मिळून गेली आहे. सोशल इंजिनिअरिंगद्वारे मतपेढी बळकट करण्याचे प्रयत्न यामागे असण्याची शक्यता नाकारता येणारी नसल्याने, या सर्वपक्षीय सहभागीतेकडे संभाव्य राजकीय समीकरणांचा संकेत म्हणूनच पाहता यावे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक