शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शिवसेनेच्या हिंसाचारासमोर सारेच हतबल!

By admin | Updated: October 15, 2015 23:15 IST

जे सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबत घडले तसेच काहीसे निखिल वागळे यांच्याबाबतही घडले होते. भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शविण्यासाठी १९९१ साली शिवसेनेने वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी खणून काढली

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)जे सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबत घडले तसेच काहीसे निखिल वागळे यांच्याबाबतही घडले होते. भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शविण्यासाठी १९९१ साली शिवसेनेने वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी खणून काढली आणि मी माझ्या तेव्हांच्या लेखात या कृतीचा शक्य तितक्या कठोर शब्दात निषेध केला होता. मी तेव्हां जिथे काम करायचो, त्या मुंबईतील टाईम्स आॅफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली व माझ्याबाबत अत्यंत शिवराळ भाषेचा वापरही केला. पण नंतर मात्र कुठलीही ईजा न करता त्यांनी मला जाऊ दिले. वागळे मात्र दुर्दैवी ठरले. त्यांचे कार्यालय तेव्हां सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये असल्याने त्यांच्या कार्यालयावर व त्यांच्यावरही हल्ला केला गेला. २००९मध्ये पुन्हा शिवसेनेने मुंबईतल्या आयबीएन-लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केला आणि वागळेंना मारहाण केली. तेव्हां मी आयबीएन नेटवर्कचा मुख्य संपादक होतो व या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करावी यासाठी आग्रही होतो. काही लोकाना अटकही झाली, पण अल्पावधीत ते जामिनावर मुक्त झाले. सेनेने हल्लेखोरांचा सत्कारही केला. पण नंतर हे प्रकरण मिटले. आता पुन्हा हल्ला झाला आहे आणि कुणीतरी त्याचा बळी ठरला आहे. १९६६पासूनचा शिवसेनेचा इतिहास केवळ शाईने नव्हे तर रक्तानेदेखील माखला आहे. जो कोणी सेनेच्या विरोधात सूर काढेल, त्याला धमक्या देण्यात आल्या आहेत. शाईचे हल्ले झाले आहेत आणि दंगली घडवून आणून खूनसुद्धा पाडले आहेत. (शिवसेनेवर १९७०मध्ये झालेल्या कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्त्येचा आरोप आहे). सेनेने हिंसेलाच आपले हत्त्यार बनविले आहे व अधूनमधून ती त्याचा वापर करीतच असते. कायद्याला अजिबातच न जुमानता शिवसेना कसे वागते याची अनेक उदाहरणे आहेत. पण त्याबद्दल सेनेवर कधीच हवी तशी कारवाई झालेली नाही. सेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी त्यांच्या बऱ्याच भाषणांमधून धार्मिक तेढ वाढविणारीे वक्तव्ये करून भारतीय दंड विधानाच्या १५३ (अ) आणि (ब) चे उल्लंघन केले आहे. पण तरीही त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांना केवळ २००७ साली एकदाच अटक झाली व लगेच त्यांना जामीनही मिळाला. (त्यांना पहिली अटक १९६९ साली दंगलीच्या गुन्ह्यात झाली होती). अटकेपूर्वी मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हां ते म्हणाले होते की ‘मला धक्का जरी लागला तरी सगळा देश पेटून उठेल’. पण प्रत्यक्षात अटक झाली तेव्हा तसे काहीच घडले नाही. तरीही तो संदेश कायदा राबवणाऱ्या घाबरट यंत्रणेसाठी पुरेसा होता. जेव्हा तुम्हाला कायद्याचे भय वाटत नाही, तेव्हां तुमचा कल कायदा मोडण्याकडेच असतो! महाराष्ट्रातल्या आजवरच्या प्रत्येक सरकारने शिवसेनेच्या बाबतीत सौम्य धोरणच ठेवले आहे. त्यांनी सेनेशी संघर्ष करण्याऐवजी तडजोडीला प्राधान्य दिले आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस सध्या युतीचे मुख्यमंत्री म्हणून हतबल दिसतात व त्यांची तुलना १९६०चे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी केली जाऊ शकते. नाईकांनी काही बाबतीत शिवसेनेवर कृपादृष्टी दाखवली होती. आज कॉंग्रेस पक्ष कुळकर्णी यांच्यावरचा हल्ला देशासाठी लज्जास्पद असल्याचे म्हणतो आहे, पण मग भूतकाळात त्यांनी सेनेला अशा हल्ल्यांसाठी मोकळीक का दिली होती याचे उत्तरही आता त्यांनी द्यावे. यातील मौजेचा भाग म्हणजे मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरु पम एकेकाळचे शिवसैनिक आहेत व तेच आता सेनेची निर्भर्त्सना करीत आहेत. शिवसेनेची स्वत:ची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. तिने मुंबईतल्या मराठी मनातील नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना नेमकी हेरली आहे. हे लोक नेहमीच स्वत:च्या दुर्दशेसाठी इतरांना दोष देत असतात. याची सुरुवात १९६० साली झाली. दक्षिण भारतीयांनी मुंबईतील कारकुनाच्या जागा बळकावल्या म्हणून सेनेने त्यांना लक्ष्य बनविले, तर आजचा काळ उत्तर भारतीयांना शत्रू मानण्याचा आहे. त्यांच्यावर स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतल्याचा आरोप आहे. मुंबईत सध्या भूपुत्राचा मुद्दा प्रबळ आहे. हे भूपुत्र अत्यल्प उत्पन्नावर जगत आहेत पण सेनेला त्यांचा खंबीर पाठिंबा असून त्यांना मराठी माणूस म्हणून विशेष वागणुकीची अपेक्षा आहे. सेनेचा हिंसेशी असलेला संबंध लक्षात घेता मुंबई शहराचे बहुरंगी आणि बहुढंगीपण आणि या शहराचा तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद हे कसे एक मिथक आहे याची साक्ष मिळते. सहजीवन आणि सहिष्णुता यांची चर्चा होत असताना जेव्हां हिंसेला समर्थन मिळते तेव्हां ते अतिरेकी हिंदुत्ववाद्यांच्या हातातले बाहुले बनते. एकदा एक मराठी संपादक मला म्हणाला, ‘सेना ही सर्वसामान्य प्रश्नांना वाचा फोडत असते’! मुसलमानांवरील अविश्वास हिंदूंच्या अंत:करणात खोलवर रुजला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची प्रतिमा पुढे करून शिवसेना स्वत:ला हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणवून घेते. तशी दंतकथाही पसरवली गेली आहे. यासाठी १९९२-९३च्या मुंबई दंगलीचे उदाहरण देता येते. काही उच्चभ्रू मुंबईकरांच्या दाव्याप्रमाणे दंगलीतील शिवसेनेच्या सहभागामुळेच मुंबई वाचली, अन्यथा मुसलमानांनी ती केव्हाच संपवली असती. इथे दंगलीची चौकशी करणारा श्रीकृष्ण अहवाल कशा प्रकारे अरबी समुद्रात फेकला गेला, हे लक्षात घ्यायला हवे. हिंसक कारवायांना घाबरणाऱ्या व शांत बसणाऱ्या मुंबईतील उच्चभ्रू लोकांमुळे सेना हिंसाचार करीतच राहते. कदाचित ते इतके भयभीत असावेत की ते काही बोलूच शकत नाहीत. साहजिकच अनेक प्रतिष्ठित लोकांच्या या शहरातील खूपच कमी लोकानी सेनेला सामोरे जाण्याची हिंमत आजवर दाखवली आहे. उलट चित्रपट उद्योगातील अनेक लोक ‘मातोश्री’समोर मुहुर्ताचा शॉट घेण्यासाठी रांग लावतात, महान क्रिकेटपटू आशीर्वादासाठी जातात तर उद्योगपती सेनेशी संबंधित संघटनांशी तडजोडी करण्यासाठी तिथे जातात. कॉंग्रेसचे खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा संजय जेव्हां मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अडकला होता तेव्हा, सुनील दत्ता स्वत: बाळासाहेबांकडेच मदतीसाठी गेले होते. त्यामुळे सचिन तेंडूलकर वा लता मंगेशकर भारतरत्न असतील तर मुंबईच्या संदर्भात बाळ ठाकरे हेच जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही भारतरत्न राहिले आहेत व त्यांचा परिवार मुंबईचा प्रथम परिवार राहिला आहे. ताजा कलम: १९८९साली जेव्हा मी पहिल्यांदा बाळ ठाकरेंना भेटलो, तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही माझ्या प्रिय मित्राचे म्हणजे क्रिकेटर दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव आहात, महाराष्ट्रीयन आहात, भारतीय आहात मग तुम्ही आमच्या बाबतीत टीकाकाराच्या भूमिकेत का असता’? त्यावेळी मला सांगावेसे वाटले होते की ‘राष्ट्रभक्ती साहेब! कारण तेच तर एका सैतानाचे अखेरचे आश्रयस्थान असते’. पण मी त्यावेळी तेवढी हिंमत बांधू शकलो नव्हतो.