शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

मद्यपी पर्यटकांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 7:45 AM

पुणे येथून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले.

पुणे येथून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले. रिसॉर्टच्या काऊंटरवरील मालकीण या अपघातात नाहक मरण पावली. पूर्ण गोवा राज्य हादरले. पर्यटकांनी अशाप्रकारे दारूच्या नशेत वागण्याची ही पहिली घटना नव्हे. गोव्यात अधूनमधून पर्यटकांचा असा धिंगाणा व निषेधार्ह वर्तन सुरू असते. दंगामस्तीबाबत काही वेळा पोलिसांकडून पर्यटकांना अटकही केली जाते. मग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून गोव्याची बदनामी करण्याची संधी काही जण घेत असतात, हा वेगळा विषय आहे. पर्यटकविरुद्ध गोमंतकीय असा संघर्ष सुप्तावस्थेत असतोच. मात्र पर्यटक मद्य पिऊन वाहन चालवून अपघात घडवतात तेव्हा आता मात्र अतिरेक झाला ही भावना गोव्यात व्यक्त होते. परवाही तेच घडले व अनेक गोमंतकीयांना मग पोलिस स्थानकावर धाव घ्यावी लागली.

अपघातात महिलेचा जीव घेणाऱ्या पर्यटकाला पोलिसांनी अटक केली व सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंद केला आहे. गोव्याला वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक भेट देतात. यात ७० लाख पर्यटक हे देशी असतात. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात व राजस्थान येथून बहुतांश पर्यटक जिवाचा गोवा करण्यासाठी येत असतात. गोव्याचे मद्याचे धबधबे फेसाळतात, स्वस्तात दारू मिळणारे ठिकाण म्हणजे गोवा, असा चुकीचा समज पर्यटकांच्या मनात असतोच. गोव्यात बिकीनी संस्कृती सर्वत्र आहे किंवा कसिनो जुगार संस्कृतीत गोवा रममाण झालाय, असे देखील अवाजवी चित्र पर्यटकांच्या मनात रंगविलेले असते. थायलंडप्रमाणे गोव्यातही मुली, महिला उपलब्ध असतात हा तर अत्यंत चुकीचा समज पर्यटकांनी करून घेतलेला आहे. स्वैर, बेजबाबदार वर्तन करून पर्यटक गोव्यात मार खातात किंवा तुरुंगात तरी जाऊन अडकतात.

अलीकडे दर आठवड्याला अशा प्रकारची एक घटना घडत असते. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी यापूर्वी अशा अप्रिय घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहेच. निष्पाप पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे वावरतात, पण त्याचबरोबर पर्यटकांनीही दारू पिऊन गैरवर्तन करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री अधूनमधून देत असतात. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता पर्यटकांची वाहने थांबवून चालकांची अल्कोमीटरने तपासणी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आपली सतावणूक होतेय, असे दारू न पिणाऱ्या अवघ्याच पर्यटकांना यामुळे वाटू शकेल. मात्र पर्याय नाही. मद्यपी पर्यटकांनीच गोव्यावर ही वेळ आणली आहे. गोव्याचे खारे वारे, शहाळ्याचे तजेलदार पाणी, ताजे मासे, चवदार खाद्यसंस्कृती, फेसाळत्या लाटांचे समुद्र, पोर्तुगीजकालीन पांढऱ्याशुभ्र चर्चेस आणि तेजस्वी दिमाखदार मंदिरे हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. रुपेरी वाळूच्या किनाऱ्यांवरून चालणे व सूर्यकिरणे अंगावर खेळवत किनाऱ्यांवरच दिवसभर पहुडणे विदेशी पर्यटकांना आवडते, काळ्याशार खडकांवर आदळून फुटणाऱ्या मनमोहक शुभ लाटा प्रेमीयुगुलांना भुरळ पाडतात. गोवा म्हणजे मेरेज डेस्टिनेशन गोवा म्हणजे हनीमून स्थळ, गोवा म्हणजे खाओ, पिओ, मजा करो, अशी तारुण्यसुलभ भावना पर्यटकांमध्ये असते व ती असण्यात काही गैर नाही. मात्र पहाटेपर्यंत पाठ्य करत मग झोपेच्या डोळ्यांनी वाहन चालवत अपघात घडविणारे पर्यटक अलीकडे या राज्यात संख्येने वाढतात.

क्लबमध्ये जाऊन किंवा कसिनो जुगाराच्या जहाजांवर जाऊन प्रचंड पैसा उधळणारे धनिक पर्यटक गोव्यात वाढत आहेत. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला हे बळकटी देतेय व त्यामुळे ३६५ दिवस पर्यटन, अशी जाहिरात गोवा सरकार करतेय. इथपर्यंत सारे ठिक आहे. पर्यटक बेपर्वा पद्धतीने वाहन चालवतात व लोकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरतात तेव्हा मात्र गोमंतकीयांचा सहनशीलतेचा अंत होतो. रेमेडिया आल्बुकर्क या ५७ वर्षीय रिसोर्ट मालकिणीचा कोणताही दोष नव्हता. ती आपल्या रिसोर्टच्या रिसेप्शन काऊंटरवर उभी राहून फोनवर बोलत होती. सचिन वेणुगोपाल कुरूप नावाच्या पर्यटकाने आपले वाहन रिसोर्टमध्ये घुसविले व तिला उडविले. तिचा जीव गेला, रिसोर्टमध्ये या मद्यपी चालक पर्यटकाने ५० ते ६० मीटर आत वाहन घुसविले. ही घटना जगप्रसिद्ध वागातोर किनारी मद्यरात्रीनंतर घडली. गोव्याच्या किनारी भागांत रात्री दहानंतर किंवा पहाटे फिरणे स्थानिक लोक टाळू लागले आहेत. काही वेळा ड्रग्जच्या आहारी गेलेले पर्यटक चाकूने हल्ला देखील करतात. किरकोळ स्वरूपाचा वाहन अपघात झाला तरी, प्रकरण हातघाईवर येत असते. काहीवेळा मद्य पिऊनच गोव्यात येताना विमानात सहप्रवासी किंवा हवाई सुंदरींशी पर्यटकांनी गैरवर्तन केल्याचीही उदाहरणे आहेतच. मद्यपी पर्यटकांची दहशत रोखण्यासाठी गोवा पोलिस यापुढे आणखी प्रभावी उपाययोजना करू पाहत आहेत.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हAccidentअपघातgoaगोवा