शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

जिंकण्याचा प्रवास इथूनच तर सुरू होतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:02 IST

‘आय डू माय वर्क टू सपोर्ट माय सर्फिंग ॲण्ड ओशन स्पोर्ट हॉबीज !’ असं तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहाल का? पण पॅडी उपटनला भेटा. ते म्हणतात, माझ्या रेझ्युमेची शेवटची ओळच ही आहे. मी कामच त्यासाठी करतो !

- अनन्या भारद्वाज(मुक्त पत्रकार)‘आय डू माय वर्क टू सपोर्ट माय सर्फिंग ॲण्ड ओशन स्पोर्ट हॉबीज !’ असं तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहाल का? पण पॅडी उपटनला भेटा. ते म्हणतात, माझ्या रेझ्युमेची शेवटची ओळच ही आहे. मी कामच त्यासाठी करतो ! - कोण हे पॅडी उपटन? 

२०११ साली भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे ते मेंटल हेल्थ कोच होते. आता अलीकडेच हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं तेव्हाही भारतीय संघाचे मानसिक आरोग्य प्रशिक्षक उपटनच होते. आणि आता डी. गुकेश विश्वविजेता झाला तेव्हाही शेवटचे काही महिने पॅडींनी त्याच्यासोबत काम केलं. 

पॅडी म्हणतात, ‘शारीरिक कौशल्य, क्रीडा कौशल्य, फिटनेस, नियोजन, स्ट्रॅटेजी सगळं महत्त्वाचंच असतं; पण मोक्याच्या क्षणी अनेक खेळाडूंची कामगिरी कोसळते, ते क्षुल्लक चुका करून हरतात. असं होतं कारण मन ऐनवेळी दगा देतं. मनाचं हे दगा देणं खेळाडूंच्याच बाबतीत घडतं असं नाही तर ते सर्वसामान्य कुणाही माणसाच्या संदर्भात घडतं. त्यासाठी मनाच्या आरोग्यावर काम करायला हवं!’ पण मुद्दा हाच की हल्ली फॅशन आहे, मनात सतत पॉझिटिव्ह विचार करा, सतत आनंदी राहा म्हणण्याची; पण ते खरंच शक्य असतं का? 

पॅडी म्हणतात, आधी हे मान्य करायला हवं की मानसिक असुरक्षितता आपल्या सगळ्यांना आहे. आपल्याला भीती वाटते, कामगिरीचा ताण येतो, असूया वाटते, नकारात्मक विचारच मनात जास्त येतात. असं असू नये हा आदर्शवाद झाला; पण ‘असं’ आहे ते मान्य करू! त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेच ‘व्हल्नरेबल’ आहोत हे मान्य करू. सगळेच मोडून पडू शकतो कधीही-कितीही वेळा! एकदा हे स्वीकारलं की त्यावर मार्ग काढता येतो!’ पॅडी म्हणतात, ‘एक सोपी गोष्ट कायम लक्षात ठेवायची- फक्त ३ शब्द- कीप इट रिअल ! चांगली झोप, योग्य आहार, व्यायाम, जवळची माणसं-मित्र त्यांच्याशी गप्पा, थोडं निसर्गाजवळ जाणं.. जिंकण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो.’ 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली