शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ऊर्जा संवर्धनात तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 4:37 AM

ऊर्जेचा वापर व पर्यायाने खर्चही कमी करण्याचे उपाय केले जात आहेत.

- दीपक शिकारपूर 

जागतिक ऊर्जा संवर्धन दिन १४ डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी ऊर्जा-वापराचे महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनात होणारा उपयोग, त्याची कमतरता आणि जागतिक पर्यावरणीय यंत्रणेच्या टिकाऊपणावर होणारा परिणाम या संदर्भात जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. लोक आणि देशाची प्रगती होत असताना, ऊर्जेचा वापर वाढेल.

कळत नकळत आपणापैकी प्रत्येक जण, या ना त्या प्रकारे, दररोज बरीच ऊर्जा आणि स्रोत वाया घालवत असतो. या बचतीच्या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञान एक मोठे व्यूहात्मक हत्यार बनू शकते. संगणकांना आणि एकंदरीनेच आयटीशी संबंधित उपकरणांना भरपूर वीज लागते. औद्योगिक जगाच्या एकूण वीजवापरापैकी ४२ टक्के वापर आयटी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राकडून केला जातो. नव्या उत्पादनतंत्रांमुळे संगणक व इतर साधनांच्या (पेरिफेरल्स) किमती झपाट्याने कमी होत आहेत. परंतु ऊर्जेवर करावा लागणारा खर्च वाढतो आहे. २०२२ नंतर तर, प्रत्यक्ष संगणकीय उपकरणांच्या (हार्डवेअरच्या) किमतीपेक्षा, ती चालवण्यासाठी लागणाऱ्या विजेचा खर्च अधिक होणार आहे! पर्यावरणपूरक माहिती तंत्रज्ञानाच्या या संकल्पनेमधून आयटीमुळे पर्यावरणावर होणाºया दुष्परिणामांबाबतच्या धोरणांचे व प्रयत्नांचे मूल्यमापन केले जात आहे.

ऊर्जेचा वापर व पर्यायाने खर्चही कमी करण्याचे उपाय केले जात आहेत. उदा. ‘सर्व्हर व्हर्चुअलायझेशन’च्या तंत्राने उद्योगांना आपला हार्डवेअरवर होणारा खर्च तर वाचवता येतोच शिवाय ऊर्जावापर, व्यवस्थापन आणि देखभालीचा खर्चही कमी होतो. जगभरातील हजारो डेटा सेंटर्समधले लाखो सर्व्हर्स अहोरात्र चालू असतात. ते वीज वापरतात व काम करताना भरपूर उष्णता बाहेर टाकतात. बºयाच सर्व्हर्सना ‘एसी’ उर्फ वातानुकूलन लागते. या सर्व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. सर्व्हरच्या आतील यंत्रणा थंड करण्यासाठी बसवलेल्या फॅन्सची जागा, आकार आणि संख्या बदलल्याने तसेच त्यांमधून निर्माण होणारा थंड हवेचा झोत योग्य मार्गाने फिरवल्यानेही सर्व्हरच्या ऊर्जा वापरात घट होते, असे दिसून आले आहे. त्याशिवाय योग्य प्रकारचे पॉवर सप्लाय आणि कन्व्हर्टर्सच्या वापरानेही फरक पडतो. गेल्या काही वर्षांत या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.

ऊर्जाबचतीमध्ये व्हर्चुअलायझेशन सॉफ्टवेअर्सनी देखील वाटा उचलला आहे, असे म्हणता येईल. कारण यामुळे सर्व्हर प्रत्यक्ष खरेदी न करता, आभासी सर्व्हर्सचा वापर शक्य झाला आहे. एकाच वेळी अनेक आभासी सर्व्हर्सकडून काम करवून घेणे आणि त्या कामाचे केंद्रीकरण मोजक्याच प्रत्यक्ष सर्व्हर्सवर पाहणे शक्य झाल्यामुळे मुळात डेटा सेंटरसाठी नवी प्रचंड इमारत बांधण्याचीच गरज राहत नाही. इमारतच बांधायची नसल्यामुळे त्यातील दिवे, वातानुकूलन आणि इतर बाबींवरील भविष्यातला कायमस्वरूपी खर्चही वाचतो. विकसित आणि विकसनशील देशांमधील जमिनीच्या किमती पाहता ही बचत केवढी मोठी आहे हे सहज ध्यानात येईल!

डेस्कटॉप पॉवर मॅनेजमेंट या प्रभावी उपायामुळे संगणक सुरू असेल, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर चालू नसेल अशा काळात त्यामधील समाविष्ट सॉफ्टवेअरद्वारे ऊर्जाबचतीचे उपाय केले जातात. उदा. वापर थांबल्यावर काही सेकंदांनी पडदा (स्क्रीन वा मॉनिटर) बंद झाल्याने विजेची भरपूर बचत होते. माउस हलवला किंवा कळफलकावरील एखादी की दाबली की लगेचच पडद्यावरील चित्र पूर्ववत दिसू लागते. यासाठीची सॉफ्टवेअर्स, ठरावीक काळाने किंवा विशिष्ट स्थितीमध्ये मॉनिटर बंद करतातच; शिवाय संगणकाला आपोआप सुप्तावस्थेत (स्टँडबाय) किंवा दीर्घनिद्रेमध्ये (हिबरनेशन) नेऊन ठेवतात. या स्थितीत असलेल्या संगणकांना सुरक्षितता तसेच व्यवस्थापनविषयक अपडेट मिळत राहतात.

‘यामुळे कितीशी वीज वाचणार?’ असे वरवर वाटले तरी ज्या कंपन्यांमध्ये आतापर्यत ऊर्जाबचतीच्या धोरणाचा विचारच केला गेला नसेल त्यांना पहिल्या दोन-तीन महिन्यांपासूनच जवळजवळ ४० टक्क्यांनी घटलेल्या वीजबिलाचा अनुभव थेट येऊ लागतो, असे दिसून आले आहे. शिवाय या काळात संगणकाला थंड ठेवण्यासाठी करावा लागणारा वातानुकूलनाचा खर्च वाचतो आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी होते हा आणखी एक साइड-बेनिफिट. हे सारे प्रयत्न पाहता प्रत्येकाने ऊर्जाबचत आणि पर्यावरण-रक्षणातला आपला खारीचा वाटा निभावणे आता क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :electricityवीजtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र