शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

उपाशी माणसे अन्नपाण्याविना तडफडत आहेत, कारण...

By वसंत भोसले | Updated: May 7, 2024 08:11 IST

अन्नाविना तडफडणाऱ्या देशांची संख्या वाढते आहे. पाच वर्षांपूर्वी छत्तीस देशांत ही संकटे हाेती, आता ती संख्या एकोणसाठ झाली आहे. हे चित्र काय सांगते ?

-डाॅ. वसंत भाेसले, संपादक, लाेकमत, काेल्हापूर

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने २०२३ या वर्षाचा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.  या संघटनेत जगभरातील १९१ देशांचा सहभाग आहे. मानवाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा अभ्यास  ही संघटना करते. ७९ वर्षांच्या वाटचालीत विश्वातला एकही माणूस उपाशी राहता कामा नये, या उद्देशाने या संस्थेने अखंड प्रयत्न केलेले असले तरी अद्याप तिला पूर्ण यश मिळत नाही. 

या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार जगभरातील २८ काेटी २० लाख माणसांना दाेनवेळची भूक भागविण्याइतके अन्नधान्य  मिळत नाही. ते अनेक दिवस उपाशीपोटी काढतात.  जागतिक हवामानाची बदलती परिस्थिती, महापुरासारखी संकटे,  दुष्काळ, वादळे, राेगराई, जंगलांना आगी लागण्याचे प्रकार अशा संकटांचा अभ्यास  ही संघटना करीत आहे. गेल्या पाच वर्षांत अन्नाविना तडफडण्याची पाळी येत असलेल्या देशांची संख्या वाढते आहे. पाच वर्षांपूर्वी छत्तीस देशांत ही संकटे हाेती, आता ती एकोणसाठ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत टाेळीयुद्धे, शेजारच्या राष्ट्रांबराेबरची युद्धे, दहशतवादी टाेळ्यांचा धिंगाणा, आदी कारणांनी अन्नधान्यापासून वंचित राहणाऱ्या देशांची संख्या वीस झाली आहे. या देशातील तेरा काेटी पन्नास लाख जनता अन्नापासून दूर आहे. इतक्या लोकांना दोनवेळचे साधे जेवण मिळत नाही. सुदान, गाझापट्टी (पॅलेस्टाईन) आणि अफगाणिस्तान बरोबरच काही आफ्रिकी देशांचा यात समावेश आहे. लहान मुले आणि महिलांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांतील काही देशांत सलग तीन-चार वर्षे दुष्काळ पडताे आहे. त्याच्या परिणामामुळे सात काेटी सत्तर लाख लाेक अन्नाविना तडफडत आहेत. ही जनता विविध अठरा देशांत विभागली गेलेली आहे.

 जागतिकीकरणाच्या फायद्याबराेबर अविकसित देशांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे किमान एकवीस देशांना आपल्या देशवासीयांची दाेन वेळच्या अन्नाची गरज भागविता येत नाही. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक शून्यावर आली आहे. त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर झाला आहे. त्या त्या देशांच्या चलनाच्या अवमूल्यनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून अन्नधान्याची खरेदी करता येणे दुरापास्त झाले आहे. आर्थिक महासत्तांच्या जीवघेण्या स्पर्धेत अशा एकवीस देशांतील सात काेटी पन्नास लाख जनतेस दाेनवेळचे अन्न खरेदी करता येत नाही. हवामानातील बदल आणि आर्थिक नाकेबंदीने बेजार  असताना शेजारच्या देशांबराेबर शिवाय देशांतर्गत वांशिक, धार्मिक दंगलीने २८ काेटी २० लाख इतकी जनता अन्नाविना तडफडते आहे. 

या गंभीर समस्येच्या कारणांचा शाेध घेऊन ही संघटना अनेक उपायही सुचवित असते. संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारानेच तांदूळ उत्पादन आणि विकासाचा माेठा कार्यक्रम घेतला. आशियाई खंडातील देशांची अन्नाची गरज तांदळावर भागते. मनिला येथे जागतिक भात संशाेधन संस्थेचे प्रमुख, भारताच्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे तांदूळ उत्पादनात सुमारे चाळीस टक्के वाढ झाली. असे अनेक प्रयाेग अन्न आणि कृषी संघटनेला करावे लागतील. जगाच्या पाठीवरील युद्धे, टाेळी युद्धे, वांशिक-धार्मिक दंगली काबुत आणणे, बदलत्या निसर्गचक्रानुसार मानवी वर्तन-व्यवहार बदलणे,  सर्वांना सामावून घेणारी जागतिक अर्थव्यवस्था आकाराला आणणे या दिशेने प्रयत्न केल्यास मानवाची किमान अन्नधान्याची गरज तरी भागविता येईल! माणसाला उपाशी ठेवून होत असेल, तर ती प्रगती शाश्वत कशी असेल?

टॅग्स :foodअन्न