शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे?

By यदू जोशी | Updated: February 27, 2026 06:44 IST

सुनेत्राताईंच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले; पण आता त्यांना 'बोलावे' लागेल. त्यांची आणि पार्थ या दोघांचीही आता खरी परीक्षा असेल !

-यदु जोशी (राजकीय संपादक, लोकमत)अजितदादांच्या अपघाती निधनाला उद्या एक महिना पूर्ण होईल. दुःखातून सावरत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, आता त्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षही झाल्या आहेत. काळ थांबतो थोडाच? सुनेत्राताईच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले, पण आता आहेत त्याच मूड आणि मोडमध्ये त्या राहिल्या तर कौतुकाची जागा टीका घेईल. धीरोदत्तपणा हा आजचा गुण उद्याचा अवगुण ठरेल. संयमाचीही 'एक्सपायरी डेट' असते. धीरगंभीरता एका वळणापर्यंत ठीक असते. आता विधिमंडळात काय किंवा बाहेरही काय; त्यांना बोलावे लागेल. वारसा हा आधार आहे पण भविष्य हे कृतीतूनच लिहिले जाईल.

वयाच्या पासष्टाव्या वर्षी राजकीय कारकिर्दीची नवी उंची गाठण्यासाठी अजित पवार यांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल करवून घेतले होते, आता ती वेळ नियतीने सुनेत्रा पवार यांच्यावर वयाच्या बासष्टाव्या वर्षी आणली आहे. त्यांना वा पार्थ पवारांना मागे सारून पटेल, तटकरे पक्षाचा कब्जा घेतील, अशी आवई काही जणांनी उठवली होती, तेव्हा याच ठिकाणी असे लिहिले होते की ते शक्य नाही. ही राष्ट्रवादी असो की ती... पवार या नावाशिवाय चालू शकत नाही. आज ते खरे ठरले आहे. पटेल, तटकरे हे अष्टप्रधान मंडळात राहतील, पण प्रमुख होणार नाहीत.

सल्लागार मात्र कायम 

अजितदादांच्या जागी सुनेत्राताई आल्या, पण अजितदादांची जागा सर्वदृष्टीने त्या किती लवकर घेतात ते त्यांच्या नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. पार्थ पवार उद्या राज्यसभेत जाणारच आहेत, आईबरोबर त्यांचीही कसोटी आहे; चिडचिड न करता परिपक्वता आणणे हाच त्यांच्यासाठी योग्य मार्ग असेल. कारण आईच्या कारभारात त्यांच्या म्हणण्याला फारच महत्त्व असते, असे म्हणतात. अजितदादांची उणीव सुनेत्राताई कितपत भरून काढू शकतील, याचा अंदाज त्यांच्या पक्षातील नेते सध्या बांधत आहेत. पक्षाध्यक्ष, उपमुख्यमंत्री म्हणून पुढचे एक वर्ष सुनेत्राताईसाठी अतिशय महत्त्वाचे असेल. कारण, त्यांच्या एकूणच क्षमतेचे मूल्यमापन आतले आणि बाहेरचेदेखील करत राहतील. 'लाडावलेला मुलगा' या प्रतिमेतून बाहेर येत पार्थ पवार त्यांना किती परिपक्वपणे साथ देतात हेही महत्त्वाचे असेल.

माहिती अशी आहे की, महिन्याकाठी बक्कळ पैसा घेणाऱ्या एका सल्लागाराला घरी पाठवण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला होता. त्याच्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याची नोटीस २९ जानेवारीला देण्याचे ठरले होते. पण अजितदादा गेले अन् सल्लागार अजूनही कायम आहेत. गेल्या महिनाभरात आपले कोण आणि परके कोण, याची एक यादी सुनेत्राताईंनी तयार केली असेलच. अजितदादांचे जे अगदी खूपच निष्ठावंत होते ते सुनेत्राताईजवळ इच्छा असूनही मन मोकळे करू शकत नाहीत आणि राजकीय मजबुरी म्हणून जे अजितदादांना नेते मानायचे ते आता चमकोगिरी करत आहेत, असे म्हणतात.

विरोधी पक्षनेता नाही अन् विरोधकही नाहीत

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसताना होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधी पक्षनेता तर नाहीच, पण विरोधही दिसत नाही. संख्येने दुबळे असलेले विरोधक सरकारवर हल्ला चढवण्याबाबतही खूपच कमकुवत दिसतात. सरकारची कोंडी होण्याऐवजी विरोधकांचीच झालेली दिसत आहे. तीन पक्षांमधील समन्वय बेपत्ता झाला आहे. सरकारशी भांडायचे सोडून राज्यसभेच्या एका जागेसाठी एकमेकांशीच भांडत आहेत. नाना पटोले यांच्याकडे गोव्यात लग्न होते, त्यामुळे ते पहिल्या आठवड्यात अधिवेशनात नव्हते. सोमवारपासून ते येतील तेव्हा विरोधकांची कामगिरी एकदम उंचावेल, अशी अपेक्षा करावी काय?

जाता जाता

सार्वजनिक बांधकाम विभागात २९३ कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. चर्चा अशी आहे की, 'धर्मा'च्या नावाखाली अधर्म केला जात आहे. सोबत कोणी दिनेशही आहे म्हणे! सरकारी नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांकडून 'मागणी' केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. 

अशा तरुणांचे सरकारबद्दल आणि एकूणच सरकारी नोकरीबद्दल काय मत होईल? हेच की इथे पैसे द्यावे लागतात आणि खावेही लागतात. या परस्पर झालेल्या अधर्मामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या राज्यमंत्र्यांनी धर्मासह तिघांना खूप झापले म्हणे, पण उपयोग काय? घ्यायचे ते घेऊन झाले आहे, आता कनिष्ठ अभियंत्यांना ते परत थोडेच दिले जाणार? मोठी इनिंग खेळण्याची संधी असलेल्या नेत्यांनी अपप्रवृत्तींना दूर केलेच पाहिजे. 

'सावज टप्प्यात आल्याशिवाय मी शिकार करत नसतो' असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी टप्प्यात आलेल्या अपप्रवृत्तींना टिपले पाहिजे.yadu.joshi@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : From Deputy CM to National President: What's Next for Sunetra?

Web Summary : Sunetra Pawar's rise after her husband's death sparks debate. Her leadership style faces scrutiny. Parth Pawar's role is also critical. Corruption allegations in government appointments surface, demanding immediate action from leaders.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र