शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:53 IST

संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नरमहाराष्ट्रीयन समाजमनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन समाजमनाची मशागत समताधिष्ठित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. बाराव्या-तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन समाजाची एक निकड म्हणून  उदयास आले. पूर्वांपार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अज्ञानाने अंधारलेल्या समाजमनाला ज्ञानाच्या उजेडात योग्य वाटा दाखविण्याची किमया संतांनी केली.  

कर्मकांडे, जातीय, धार्मिक कट्टरतेचे स्तोम माजलेले होते, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या टाचेखाली समाज रगडला जात होता; त्याच काळात परकीय आक्रमकांनी आपली मुळे इथे रुजवायला सुरुवात केली होती. म्हणजे परकीयांचा सत्तालोलूप मस्तवालपणा आणि स्थानिक वर्चस्ववाद्यांची मग्रुरी यात समाज भरडला जात होता. त्यावेळी संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली. वारकरी संतांनी उभी केलेली ही भागवत धर्माची भक्कम इमारत आज सातशे वर्षे उभी आहे. पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या या खेळात सर्वच इतके रंगून गेले की, सर्व भेद आपोआप गळून पडले. किंबहुना त्यासाठीच हा जात-धर्मविरहित भागवत धर्माचा खेळ मांडलेला आहे.

कोणतेही अवघड कर्मकांड नाही, कोणतेही बाह्य उपचार नाहीत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीळा लावला की, अन्य कोणताही देखावा करावा लागत नाही. टाळ-मृदंगाच्या तालावर आपोआपच आनंदाचा कल्लोळ निर्माण होतो. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, स्री-पुरुष हे सर्व भेद गळून पडतात. एरवी आपल्या उपाधीच्या श्रेष्ठत्वाचा डोलारा घेऊन मिरवणारे पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या खेळात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या या सर्व उपाध्या गळून पडतात आणि उरते ते केवळ निखळ माणूसपण! 

निर्मळ मनाने उचनीचतेचा गढूळपणा मागे सारुन स्वच्छ समाज निर्मितीची वाट संत चळवळीने मोकळी केली. अवघड दुस्तर वाटा मोडून टाकून भक्तीपंथ बहुसोपा केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022