शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

‘बारामतीकरां’ची झप्पी.. ‘अकलूजकरां’ची चुप्पी !

By सचिन जवळकोटे | Updated: May 9, 2021 08:04 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

‘जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतील तर फक्त अकलूजकरच,’ अशी डरकाळी ‘सिंहा’नं फोडली. ‘रणजितदादां’चा हा आत्मविश्वास पाहून बिच्चाऱ्या जनतेलाही विश्वास वाटला की ‘आता तोंडचं पाणी पळविलं जाणार नाही.’ बाकीचे सारे नेते निव्वळ पत्रकबाजीत रमले असताना साऱ्यांचंच लक्ष या ‘अकलूजकरां’कडं; पण कुठलं काय...‘उजनीचं पाणी’ पेटून पंधरा दिवस उलटून गेले तरीही ‘शिवरत्न’वरून भूमिका जाहीर नाहीच.

पालकमामां’नी गमाविला जिल्ह्याचा नैतिक विश्वास ! 

भीमातीरीच्या प्रचारादरम्यान पस्तीस गावांना पाणी देण्याच्या बाता किमान छत्तीस वेळा केल्या गेल्या. मतदान झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच ‘भरणेमामां’चं दुसरं रूप सोलापूरकरांना कळून चुकलं. नवीन पाणी देणं तर सोडाच, आहे तेही पाणी पळविण्याचा (त्यांच्या सभ्य भाषेत वळविण्याचा!) प्लॅन उघडकीस आला. इथल्या जनतेला प्रचंड धक्का बसला. विषय फक्त पाण्याचा नव्हता. विश्वासघाताचा होता. पाठीत खुपसल्या गेलेल्या खंजिराच्या धारदारपणाचा होता.

घास भरवू पाहणाऱ्या पालकांवर डोळे मिटून विश्वास ठेवणाऱ्या बालकाला जेव्हा कळतं की, घासात हळूच विष कालवलं गेलंय. तेव्हा त्याचं भावविश्व जसं उद्‌ध्वस्त होईल, तशीच भयावस्था सोलापूरकरांची झालेली. आता घसा कोरडा होईपर्यंत ‘भरणेमामा’ सांगत सुटलेत की, ‘आम्ही कुणाच्या तोंडचं पाणी पळविणार नाही.’  मात्र ‘पाणी कुणाचं’ हा मुद्दा तांत्रिक होता. या जिल्ह्याला विश्वासात न घेता परस्पर पाणी नेण्याचा मुद्दा नैतिकतेचा होता..  अन्‌ जिल्ह्याचा हाच नैतिक विश्वास ‘पालकमामां’नी आता कायमस्वरुपी गमाविलाय. हेच खरं.

आजपावेतो सोलापूरकरांच्या करंट्या ओंजळीत सांडपाणीच ओतलं जात होतं, हे सत्य ‘पालकमामां’नी प्रांजळपणे कबूल केलेलं. व्वाऽऽ हे ग्रेट मामा म्हणजे एकदम सत्यवचनी. शहराच्या दुहेरी पाईपलाईन भूसंपादनाचा निधी तोंडावर फेकला म्हणजे अख्खा जिल्हा आपल्याला वाजंत्री-बिजंत्री वाजवत पाणी वळवून देईल, असंही त्यांना वाटलेलं. व्वाऽऽ हे डबल ग्रेट मामा म्हणजे राजा हरिश्चंद्राचा जणू अवतारच.. पण इथली जनता भोळी हाय, पण येवढीबी खुळी नाय. लगाव बत्ती..

असो. ‘उजनी’तून शास्त्रशुद्धरित्या पाणी वळविण्याचं काम कसं कायदेशीर आहे, हे पटवून देण्यासाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचीही टीम ‘मामां’च्या मदतीला धावली. इथले अधिकारी मात्र चिडीचूप. बहुधा अनेकांची फॅमिली पुण्यातच असल्यानं निष्ठा विभागली गेली असावी. पण यात ‘पुणेरी’ प्रेमापेक्षा ‘बारामती’च्या भीतीची तीव्रता अधिक. कारण याचे खरे सूत्रधार कोण साऱ्यांनाच माहीत. ‘बारामती’ लोकसभा मतदारसंघात ‘इंदापूर’ येतं हेही जगाला ठावूक...अन्‌ ‘बारामतीकर’ कधीही नियमबाह्य काम करत नाहीत, याचाही साऱ्यांना अनुभव.. कारण चुकीचं कामही ते कायद्यात बसवूनच करतात, असं त्यांचेच चेले कौतुकानं खाजगीत सांगतात. 

आता विषय सोलापूरच्या स्थानिक नेत्यांचा. ‘उजनी’चं पाणी वळविण्याचे चार प्रोजेक्ट कसे पद्धतशीरपणे सुरू केलेत, हे गुपित इंदापूरकरांना सांगणाऱ्या ‘मामां’चा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीही इथले नेते केवळ पत्रकं काढण्यातच मश्गुल. पत्रकार परिषद घेण्यातच रममाण. हे काम प्रत्यक्ष कसं थांबवायला हवं, यावर प्रॅक्टिकल आक्रमकता कुणाचीच नाही. ‘पाय ठेवू न देण्याची भाषा’ करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ‘पालकमामा’ दोन वेळा बैठकाही भरवून गेले. (कडक पोलीस बंदोबस्तात बरं का..).

कधीकाळी पंढरपूर वारी फोटोग्राफीसाठी हेलिकॉप्टरमधूनच ‘उजनी’ बघितलेल्या  ‘सीएम’च्या कट्टर ‘सैनिकां’नाही बहुधा या पाण्याच्या गांभीर्याची जाण नसावी. कारण आजपावेतो  पाणी-ऊस-साखर हे विषय या ‘भगवं उपरणं’वाल्यांपासून कोसो मैल दूर. त्यांना बहुधा या प्रश्नाशी कशाचंच देणं-घेणं नसावं. लगाव बत्ती..

राहता राहिला विषय दोन मोठ्या नेत्यांचा. ‘अजितदादां’च्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या ‘संजयमामां’नी याला विरोध केलेला; मात्र पाणी जाण्याच्या संतापापेक्षाही ‘बारामतीकरां’च्या हृदयात असल्याचा आनंद त्यांच्या पत्रकात अधिक होता. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे, त्यांनी कालच ‘जयवंतरावां’ना लेखी पत्र तरी पाठविलं. मात्र त्यातही पाणी देण्याच्या पर्यायावर अधिक चर्चा करण्यात आलेली. ‘उजनी’प्रश्नी सारा जिल्हा पेटला असताना ‘रणजितदादा’ मात्र अद्याप मौनावस्थेतच. ते ‘बारामतीकरां’ना घाबरतात, असंही कदापि नाही. मात्र गप्प राहून वेगळा ‘गनिमी कावा’ करण्याचा त्यांचा विचार असेल तर तशीही हालचाल कुठं नाही. मग ‘अकलूजकर’ गप्प का ? होय. सारा जिल्हा विचारतोय.. दादाऽऽ सारा जिल्हा विचारतोय. तुम्ही गप्प का ?खरंच ‘अकलूजकरां’ची भूमिकाही कधी कधी अनाकलनीयच वाटते.

 २००९ ला ‘माढा लोकसभे’ला त्यांनी ‘थोरल्या काकां’साठी स्वत:हून जागा सोडली, तेव्हा सोलापूरच्या ‘डीसीसी’त ‘रणजितदादां’नी घाईघाईनं पत्रकार परिषद घेतलेली. ‘काका’ खासदार झाले, तरच मागासलेल्या सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा होईल, हे पोटतिडकीनं सांगू लागले. तेव्हा एका पत्रकारानं त्यांना शांतपणे एवढंच विचारलं होतं, ‘याचा अर्थ आजपर्यंत तुम्ही विकास केलाच नाही, असं समजायचं का ? ’या प्रश्नावर त्या काळच्या त्यांच्या स्वभावानुसार ते भडकले. (तेव्हा ते बँकेचे चेअरमन होते नां)  ‘मला माहीत होतं,  हा प्रश्न तुम्ही नक्की विचारणार,’  असं उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. जुना इतिहास आठवण करून देण्याचं कारण की, आताही तस्साऽच प्रश्न लोकांच्या मनातून उमटू लागलाय, ‘दादाऽऽ तुम्ही अद्याप शांतच. याचा अर्थ तुम्हाला हे नवं पाणी वाटप मान्य, असंच समजायचं का?’ लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकPuneपुणे