शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्रतिगामी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 2:15 AM

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणा-या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवू नयेत असे म्हटले आहे.

- वंदना खरेमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणा-या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवू नयेत असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या जाहिरातींविषयी तक्रारी येत असल्याचे सांगून नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र कंडोमच्या जाहिरातींवर वेळेचे निर्बंध घालणे हा प्रतिगामी निर्णय असल्याचा मतप्रवाह आहे. याबाबतच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया.कंडोमच्या जाहिरातींवर वेळेचे बंधन असणे हा मूर्खपणाचा निर्णय आहे. या निर्णयातून नेमके काय साधायचे आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे रात्रंदिवस आपण काय पाहिजे ते पाहू शकतो. या निर्णयामागे असणाºया शासकीय यंत्रणांना अजूनही शारीरिक संबंध हे केवळ प्रजननासाठी असतात, असेच वाटते ही खेदजनक बाब आहे.कंडोमची जाहिरात दाखविण्यात काहीच चूक नाही. सेक्सकडे केवळ प्रजननाच्या दृष्टीने पाहणे अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या स्त्रीकडे केवळ मुले जन्माला घालणारे यंत्र म्हणून पाहणेही अत्यंत चुकीचे आहे. या जाहिरातींवर बंदी घालण्याऐवजी हिंदी सिनेमांमधून स्त्रियांच्या चुकीच्या प्रतिमा दाखविण्यात येतात याविषयी कुणीच बोलत नाही. या सिनेमांमधूनही कुठलीही दृश्ये कोणत्याही वेळी टीव्हीवर दाखविण्यात येतात. त्या सिनेमांमधूनही मुलांच्या मनावर चुकीचे परिणाम होतात. मात्र त्याविषयी कधीच कुठे वाच्यता होत नाही. परंतु, केवळ शारीरिक संबंधाविषयी कुठे दाखविले की लगेच उलटसुलट चर्चांना उधाण येते.कुटुंब नियोजनाची साधने समाजात उपलब्ध असतानाही बºयाचदा गर्भपात हे कुटुंब नियोजनाचे साधन म्हणून वापरण्याची सक्ती असते. कारण पुरुषांना कंडोम वापरायचा नसतो, ते टाळाटाळ करतात. याउलट कंडोम वापरल्यामुळे रोगप्रतिबंध, कुटुंबनियोजन अधिक सोपे होते. पुरुषांचा शारीरिक संबंधाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे याचे दुष्परिणाम स्त्रीला सहन करावे लागतात. परिणामी, गर्भपात करण्याची वेळ येते. यामुळे त्या स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते याकडे कुणीच गांभीर्याने पाहत नाही.शासकीय पातळीवरील असा निर्णय चुकीच्या समजुतींना खतपाणी घालणारा आहे. याउलट सर्व स्तरावर पुरुष नसबंदीचा प्रसार केला पाहिजे. ‘सेफ सेक्स’च्या संकल्पनेंतर्गत कंडोमचा अधिकाधिक प्रसार करण्यावर भर दिला पाहिजे. भारतातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निरोगी आणि पुरेशा अंतराने मूल जन्मास घालण्यासाठी दाम्पत्यांना कुटुंबनियोजन सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. प्रौढ जोडप्यामध्ये सुरक्षित शरीरसंबंध,पत्नीवर मातृत्व न लादणे व लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंबनियोजनाची त्रिसूत्री आहे. संततिनियमन ही जोडप्यामधील कोणत्याही एकाने पुरेशी काळजी घेतली तरी साध्य होणारी गोष्टआहे. यापलीकडे जाऊन समाजात सध्या लैंगिकतेचे शिक्षण देणे गरजेचे आहे. आयुष्याला व्यापणाºया लैंगिकतेविषयी भावनिक, सामाजिक पैलू उलगडणे याची समाजात खरी गरज आहे. लैंगिकता म्हणजे आपण माणूस असण्याचा गाभा आहे. लिंग, लिंगभाव, लिंगावर आधारित ओळख आणि भूमिका (स्त्री, पुरुष इत्यादी), लैंगिक कल, सुख, लैंगिक नाती आणि संबंध व प्रजनन अशा अनेक गोष्टींचा समावेश लैंगिकतेमध्ये होतो. लैंगिकता विविध माध्यमांतून व्यक्त होते आणि विविध प्रकारे अनुभवली जाते. विचार, स्वप्ने, इच्छा, विश्वास, दृष्टीकोन, मूल्य, वागणूक,प्रचलित रीती, भूमिका आणि नातेसंबंध या सर्वातून आपली लैंगिकता व्यक्त होते आणि आपल्याला लैंगिकतेचा अनुभव येतो. या सर्व संज्ञा भविष्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे.हास्यास्पद निर्णय - डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञकोणत्याही उत्पादनाची मार्केट व्हॅल्यू तपासण्यासाठी जाहिरातींचे मार्केट सर्व्हे करतात. त्याप्रमाणे, ज्या वेळेस उत्पादनाची विक्री अधिक होते, त्या वेळी ती जाहिरात अधिक प्रमाणात दाखविण्यात यावी, असा निकष असतो. मात्र, कंडोमच्या जाहिरातींवर आलेला वेळेच्या बंधनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अन्य कुठल्या तरी उत्पादनाविषयी असे शास्त्रीय कारण असणे योग्य आहे. मात्र, कंडोमविषयी अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज असताना, अशा प्रकारचा निर्णय समोर येणे निव्वळ हास्यापद आहेज्या वेळी कंडोमचा वापर करायचा असतो, त्या वेळेस या उत्पादनाची विक्री होते, हा समजच चुकीचा आहे. विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व संबंध असतात, त्या वेळी कुणी वेळ पाहत नाही. कंडोमची जाहिरात करणे हे नैतिकच्या विरोधातील नाही. कंडोमची जाहिरात करणे ही योग्यच आहे. याउलट समाजातील सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन, अत्यंत भान राखून अधिक सृजनशीलपणे कंडोमच्या जाहिराती तयार केल्या पाहिजेत, जेणेकरून याविषयी समाजातील तळागाळात जनजागृती होईल.जगभरात कंडोमच्या आणि मद्याच्या जाहिरातीत कायमच ‘स्त्री’चा वापर होतो. त्यामुळे ज्या पद्धतीने या जाहिराती दाखविल्या जातात, त्याचा अजिबात बाऊ करू नये. या उलट शालेय विद्यार्थ्यांनी जरी याविषयी प्रश्न विचारले असता, पालकांची किंवा मोठ्या माणसांची उत्तरे देण्याची तयारी असली पाहिजे. कंडोम हे रोगप्रतिबंधासाठी वापरतात, हे सांगितले गेले पाहिजे. ते केवळ अनैतिक संबंधासाठी आहे, असे नाही. याचा वापर कुटुंब नियोजनासाठीही होतो, हे सांगितले गेले पाहिजे. कंडोमची जाहिरात ही नेहमीच पुरुषांना गर्भनिरोधक साधन वापरण्याला उद्युक्त करणारी आहे आणि स्त्रीला गर्भनिरोधक साधने वापरण्यापेक्षा पुरुषांनी ही साधने वापरणे हे कधीही श्रेयस्कर असते. ज्या स्त्रिया गर्भनिरोधक औषधे वापरतात, त्याने तिच्या शरीराला हानी पोहोचते, शिवाय रोग प्रतिबंधही होत नाही. त्यामुळे वैद्यकीय जगतातील तज्ज्ञांनी नेहमीच गर्भनिरोधक वा रोगप्रतिबंधक म्हणून पुरुषांनी वापरण्याच्या कंडोमला अधिक महत्त्व दिले आहे.कुतूहल शमवणा-या जाहिराती हव्यातमुले रात्री टीव्ही पाहात नाहीत, हे स्पष्ट करणारे कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण दिवसभरातील जाहिराती बंद करू शकतो, परंतु रात्री प्रसारित होणाºया जाहिराती लहान मुले पाहणार नाहीत, याची खात्री देऊ शकत नाही. ज्या गोष्टी करू नका, असे घरातील मोठ्या व्यक्ती लहान मुलांना सांगतात, त्या गोष्टींबाबत मुलांमध्ये कुतूहल असते आणि त्याच गोष्टी मुले कुतूहलापोटी करतात. त्यामुळे अशा जाहिराती दाखविण्यासोबत मुलांना त्यांच्या वयाशी सुसंगत शास्त्रीय माहिती द्यायला हवी. शासन हे टीव्हीवरील जाहिराती बंद करू शकते. मात्र, इंटरनेट, मोबाइलवरील भडक जाहिराती, व्हिडीओ, चित्रे, फोटो किंवा लिखित स्वरूपातील माहिती बंद करू शकत नाही. या सर्व गोष्टी मोबाइल, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे फक्त टीव्हीवरील जाहिरातींवर बंदी घालण्यात काही अर्थ नाही, तसेच वर्तमानपत्रात येणाºया जाहिरातीसुद्धा भडकच असतात. त्या पाहणे बंद होऊ शकत नाही, याउलट या जाहिराती मुलांपर्यंत पोहोचायला हव्यात. वयात येणाºया मुलांसाठी या जाहिराती गरजेच्या आहेत. घरातील लहान मुलांचे कुतूहल शमेल आणि मोठ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल, अशा प्रकारे सर्व जाहिराती तयार करायला हव्यात. अशा जाहिराती बंद करून, आपण आपल्या समाजातील पडदा पद्धतीला उत्तेजना देत आहोत.- प्रा. रचना पोतदार, मानसशास्त्राच्या प्राध्यापिकाभडकपणा हवा कशाला?कंडोमच्या जाहिराती या मुळात सामाजिक संदेश देण्यासाठी दाखवण्याची गरज आहे. मात्र सर्वच कंपन्यांमध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरू असल्याने जाहिरातीत भडकपणा वाढला आहे. जाहिरातीमधील शृंगारिकतेचा परिणाम विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहे. मुळात ज्या गोष्टीचा वापर पर्याय म्हणून होतो, त्याच्या इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवण्याची गरजच काय? कारण आजही अनेक औषधांच्या जाहिराती दाखवल्या जात नसून त्यांचा खप कंडोमहून अधिक आहे. शाळेत लैंगिक शिक्षणाचे धडे देताना चार भिंतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक, तर विद्यार्थिनींना शिक्षिका माहिती देतात. याउलट लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली कंडोमच्या जाहिराती या सर्रासपणे सहकुटुंब टीव्हीचा आस्वाद घेताना समोर येतात. त्यामुळे अनेकदा पालक मुलांसमोर अवघडतात. त्यामुळे ही बंदी योग्य असून रात्री उशिरापर्यंत बंदीची वेळ वाढवण्याची गरज आहे.- प्रशांत रेडीज, अध्यक्ष, मुंबई मुख्याध्यापक संघ

उन्माद कमी करावासरकारने लोकसंख्या वाढीवर व एड्सवर नियंत्रण घालणाºया कंडोमसारख्या वस्तूंच्या जाहिरातीवर ठरावीक वेळेसाठी बंदी लादणे चुकीचेच आहे. कारण हल्ली मुलांच्या हाती मोबाइल असल्याने ते या जाहिराती कधीही व कुठेही बसून पाहू शकतात. याउलट ज्या प्रकारे जाहिरातींची निर्मिती होत आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या जाहिरातींमधील उन्माद कमी करून कंडोमचा मथितार्थ स्पष्ट होतोय का? याची काळजी जाहिरात कंपन्यांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे मनावर विकृत परिणाम करणाºया जाहिरातींवर निर्बंध लादून सामाजिक संदेश देणाºया जाहिराती निर्मितीकडे सरकार व जाहिरात कंपन्यांनी लक्ष द्यायला हवे.- प्रा. मनीषा कायंदे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनामुलांमधील उत्सुकतेचे काय?जाहिरातबंदी लादली, तरी शाळेतील प्राथमिकपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल असतो. या मोबाइलच्या माध्यमातून विविध संकेतस्थळांपासून ते पॉर्न साईटवर अशा जाहिराती सर्रासपणे पाहिल्या जातात. मग केवळ अशा जाहिराती बंद करून मुलांमध्ये कामुकतेबाबत निर्माण होणारी उत्सुकता कमी करता येईल का, हा प्रश्न आहेच. शालेय शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याची शिफारस अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वीही केली आहे. मात्र दुर्दैवाने समाजासह लोकप्रतिनिधींनीही या धोरणाला विरोधच केला. परिणामी, आजही ही योजना बासनात आहे. आज संपूर्ण जगात लैंगिक शिक्षणाबाबत उघडपणे चर्चा होत असताना, भारतात मात्र चर्चेची कवाडे बंद करून ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच अनेक गैरसमज, छुप्या व अर्धवट माहितीतून समस्या निर्माण होत आहेत. यासाठी सर्वप्रथम शाळा-शाळांमध्ये जागृतता निर्माण होण्याची गरज असून पौगंडावस्थेतील मुलांना त्याचे धडे देण्याची आवश्यकता आहे. पालकांनी मुला-मुलींचे मित्र म्हणून संवाद साधायला हवा. लैंगिक शिक्षण हे आरोग्याची स्वच्छता, काळजी घेण्यासाठी कितपत महत्त्वाचे आहे, याची जाणीव समाजाला शाळांच्या माध्यमातून करून द्यावी लागेल. त्यासाठी शासनाला स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल. अशा प्रकारे या विषयावर शाळा-शाळांमध्ये शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे. ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ कशाला म्हणतात? हे व्हिडीओ माध्यमातून सांगता येईल. अशाच प्रकारचे संवादात्मक उपक्रम राबवून मुलांना लैंगिक शिक्षणाचे ज्ञान देता येईल. केवळ ठरावीक वेळेसाठी जाहिराती बंद करून यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. म्हणूनच आजघडीला अभ्यासक्रमामध्ये अप्रत्यक्षपणे व सहज लैंगिक शिक्षणाचा समावेश करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांशी संवाद, चर्चा तसेच खेळातून सांगितले, तरी ते अधिक परिणाम करणारे ठरेल. यासाठी गरज आहे, ती पालक, समाज, स्वयंसेवी संस्था, शाळा व शासन यांनी एकत्रित येऊन काम करण्याची. - अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद मुंबई उत्तर विभाग

टॅग्स :Advertisingजाहिरात