शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षेला वाचा; परंतु परिणाम काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:11 IST

मिलिंद कुलकर्णी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली ...

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली आहे, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उपेक्षेच्या अंधारात लोटल्या गेलेल्या क्षेत्रातील मतदार आता जागरुक आणि संघटित होऊ लागले आहे. गेल्या पंधरवड्यात भडगाव तालुक्यातील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन एक सभा घेतली. भडगाव तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भडगाव तालुका हा पूर्वी पारोळा मतदारसंघाला जोडला होता, पुनर्रचनेनंतर तो पाचोरा तालुक्याला जोडला गेला आहे. तालुका असूनही मतदारसंघात दुय्यम भूमिका बजावावी लागत असल्याने निराशेचा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. सभेच्या निमित्ताने तो अधोरेखित झाला. वेगवेगळे विचार व्यक्त झाले. भडगावकरांचा राग शांत करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जाईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. ठोस शब्द दिला जाईल. पण पुन्हा तो पाळला जाईल काय, याची शाश्वती भडगावकरांना वाटेल काय, हा महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे.अर्थात, हा विषय केवळ भडगावचा नाही. खान्देशात असे काही तालुके आहेत, ज्यांच्या वाट्याला अशीच उपेक्षा आली आहे. पारोळा तालुक्याची हीच अवस्था आहे. राजकीयदृष्टया अतीशय संवेदनशील आणि प्रभावशाली तालुक्यात एकेकाळी मंत्रिपद, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष अशी पदे होती. परंतु, आता हा तालुका अमळनेर आणि एरंडोल या दोन मतदारसंघात विभाजित झाला आहे. आमदार याच तालुक्याचा निवडून येत असला तरी अमळनेरला जोडल्या गेलेल्या भागातील जनतेला ‘आपला वाली कोण? ’ ही भावना बळावू लागली आहे. एरंडोल हे मतदारसंघाचे नाव असले तरी या भागातील नेत्याला दहा वर्षात आमदारकीची संधी न मिळाल्याने उपेक्षा पदरी आली आहे. धरणगाव आणि बोदवड तालुकेदेखील अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि मुक्ताईनगर तालुक्यांना जोडल्याने स्वतंत्र अस्तित्व राहिलेले नाही.हीच स्थिती यावल तालुक्याची झाली आहे. या तालुक्याचे विभाजन करुन रावेर आणि चोपडा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. आमदार तालुक्यातील असले तरी विभाजनाचे दु:ख तालुकावासीयांना आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुका हा शहादा मतदारसंघाला जोडला गेला आहे.धडगाव तालुका हा अक्कलकुवा मतदारसंघाला जोडला आहे. तालुके सहा असले तरी मतदारसंघ चार असल्याने ही उपेक्षेची भावना आहेच.मतदारसंघ पुनर्रचना करताना ठराविक मतदारसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी लगतच्या तालुक्यातील काही महसूल मंडळे जोडली गेली आहेत. त्यांची अवस्था तर आणखीच बिकट झालेली आहे. पाचोरा तालुक्यातील कुºहाड हे महसूल मंडळ जामनेर मतदारसंघाला जोडले गेले आहे. या मंडळाचा लोकसभा मतदारसंघ रावेर आहे. खासदारांकडे काम असले तर त्यांना मुक्ताईनगर गाठावे लागते. रावेर तालुक्यातील सावदा मंडळ हे मुक्ताईनगर मतदारसंघाला जोडले गेले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाने मंडळ हे शिरपूरला जोडले गेले आहेत. शहादा तालुक्यातील काही मंडळे नंदुरबारला जोडली गेली आहेत. नंदुरबारची दोन मंडळे नवापूरला जोडली गेली आहेत. पाच वर्षे शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजार समितीशी संबंधित कामासाठी तालुक्याला जायचे. मात्र विकास कामांसाठी दुसऱ्या तालुक्यातील संबंधित कार्यालयांशी संपर्क आणि पाठपुरावा करावा लागत आहे. हा द्राविडी प्राणायाम दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असल्याने भडगावसारखे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.उपेक्षेला वाचा फोडली असली तरी त्याचा काही परिणाम होईल, याची शाश्वती नाही. कारण हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. पुन्हा कधी मतदारसंघ पुनर्रचना होईल, तेव्हा काही मार्ग निघू शकेल. त्याला किती कालावधी लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव