शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

रद्द होत नाही तोवर

By admin | Updated: October 12, 2015 22:10 IST

जम्मू-काश्मीर राज्याला राज्यघटनेतील ज्या ३७०व्या कलमान्वये विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे, ते कलम कायमस्वरुपी असल्याचा जो निवाडा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे

जम्मू-काश्मीर राज्याला राज्यघटनेतील ज्या ३७०व्या कलमान्वये विशेष राज्याचा दर्जा प्राप्त आहे, ते कलम कायमस्वरुपी असल्याचा जो निवाडा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे, त्यात ऐतिहासिक वगैरे काहीही नाही. राज्यघटनेतील प्रत्येक कलमच कायमस्वरुपी असते. त्यामुळेच संपूर्ण राज्यघटनेच्या पुनर्विचाराची मागणी केली जाते किंवा अलीकडच्याच काळातील मागासवर्गीयांना अनुज्ञेय आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली जाते तेव्हां आगडोंब उसळत असतो. अर्थात या उसळण्याला वैधानिक नव्हे तर भावनिक आधार असतो. ३७०व्या कलमाच्या बाबतीतही काहीसे असेच आहे. घटनेतील हे कलम रद्द करावे आणि त्या राज्याला देशातील अन्य राज्यांच्या समकक्ष आणून ठेवावे ही भाजपा आणि संघ परिवाराची केवळ भूमिकाच आहे असे नव्हे तर तो त्यांचा आग्रह आहे. पण दोनदा सत्तेत येऊनही त्यांना ते जमलेले नाही. कारण राज्यघटनेतील काश्मिरविषयक किंवा अन्य काही राज्यांच्या संबंधी ज्या तरतुदी समाविष्ट आहेत, त्या हटवायच्या झाल्या तर संबंधित राज्यांच्या विधिमंडळांनाच तसा ठराव संमत करुन केन्द्राकडे आपल्या शिफारसीसह पाठविणे अगत्याचे असते. अर्थात त्यानंतरही संसदेतदेखील तीन चतुर्थांश मताधिक्य असल्याखेरीज आणि निम्म्या राज्यांचीही संमती असल्याशिवाय कोणतीही घटना दुरुस्ती अस्तित्वात येऊ शकत नाही. भाजपापाशी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळात लोकसभेतही पूर्ण बहुमत नव्हते. आज नरेन्द्र मोदी यांच्यापाशी लोकसभेतील भक्कम बहुमत असले तरी राज्यसभेत तो पक्ष अजून तरी कमकुवतच आहे. खुद्द जम्मू-काश्मीरचा विचार करायचा तर गेल्या पासष्ट वर्षात पहिल्यांदाच भाजपाला त्या राज्याच्या सत्तेची चव चाखायला मिळाली आहे. पण तीदेखील अर्धवटच. मेहबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखालील पीडीपी हा पक्ष त्या राज्यात भाजपाच्या तुलनेत वडिलकीच्या भूमिकेत आहे. साहजिकच तो पक्ष आपल्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व आपणहून गमवायला कधीही तयार होणार नाही. पण ही परिस्थिती कायम राहणार नाही अशा आशेवर भाजपा आहे आणि दीर्घकाळ तिला ही आशा टिकवून ठेवावी लागेल अशी लक्षणे आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने काही वेगळे सांगितले असे अजिबात नाही.