शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 04:50 IST

नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील.

पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून भारतातून परागंदा झालेला हिरे व्यापारी निरव मोदी याची लंडनमध्ये झालेली अटक हा एक शुभसंकेत म्हणावा लागेल. मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्ल्या याच्या पाठोपाठ भारतीय कायद्याच्या कचाट्यात आलेला मोदी हा दुसरा बडा कर्जबुडव्या भगोडा आहे. ‘पीएनबी’ प्रकरणात निरव मोदीविरुद्ध दोन प्रकारचे खटले भारतात सुरु आहेत. एक ‘सीबीआय’ने दाखल केलेला फौजदारी खटला व दुसरा अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेला  ‘मनी लाँड्रिंग ’चा खटला. या पक्र रणात आरोपपत्र दाखल होण्याआधीच निरव मोदी, त्याची पत्नी, मुलगा व मामा मेहुल चोकशी देशातून पळून गेले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द केला गेला तरी कित्येक महिने तो अनेक देशांमध्ये फिरत राहिला. समन्स काढूनही हजर न राहिल्यान े मब्ुं ाइतर्् ाील न्यायालयान े त्याच्याविरुद्ध वारॅ न्ट काढले होतेच. त्याआधारे ‘इंटरपोल’च्या माध्यमातून त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी झाली. मध्यंतरी निरव अमूक-तमूक देशात असल्याच्या बातम्या येत राहिल्या. ब्रिटनमध्येही गेल्याच आठवड्यात बिट्र नमधील ‘दि टेलिगा्र फ’ या वत्त्ृ ापत्रान े निरव मोदी लडं नच्या उच्चभू्रवस्तीतील रस्त्यावर फिरत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. तो लंडनमध्ये एका आलिशान μलॅटमध्ये राहात असल्याचे वृत्तही त्यासोबतदिले गेले. सुदैव असे की, निरव मोदीचा ठावठिकाणा ब्रिटनमध्ये लागला. सुदैव अशासाठी की भारताचा ब्रिटनसोबत प्रत्यार्पण करार झालेला आहे.विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणाचा अनुभव ताजा असल्याने भारत सरकारने लगेच ब्रिटन सरकारकडे निरव मोदीच्या प्रत्यार्पणाची औपचारिक विनंती सादर केली. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनीही वेळ न दवडता भारताची ही विनंती न्यायालयाकडे पाठविली. त्यानुसार न्यायालयाने निरव मोदीविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मंगळवारी रात्री ४८ वर्षांच्या निरव दीपक मोदीला लंडनच्या हॉलबोर्न मेट्रो स्टेशनवर अटक केली. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयापुढे हजर केले गेले. विजय मल्ल्याला न्यायालयाने लगेच जामिनावर सोडले होते. निरव मोदीनेही जामिनासाठी अर्ज केला. ज्यावर प्रवास करता येईल अशी सर्व कागदपत्रे त्याने न्यायालयाच्या हवाली केली. बँकेचे पैसेही आपण परत करण्याचे आश्वासन दिले. पण जामिनावर सोडले तर निरव मोदी पुन्हा परत येईलयाची खात्री वाटत नाही, असे नमूद करून, महिला न्यायाधीशांनी त्याला लगेच जामीन न देता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी ठेवली. त्यामुळे बदनाम झालेल्या या लक्ष्मीपुत्रास पुढील आठ दिवस तरी कोठडीत राहावे लागेल. प्रत्यार्पणाच्या कायदेशीर कारवाईची ही केवळ सुरुवात आहे.मल्ल्याच्या अटकेनंतरही त्याच्या प्रत्यार्पणास न्यायालायने मंजुरी देण्यास एक वर्षाहून अधिक काळ गेला होता. मात्र भारतासारखी ब्रिटनमध्ये न्यायालयीन प्रकरणे कित्येक वर्षे पडून राहात नाहीत, हेही खरे. न्यायालयाने मंजुरी दिली तरी प्रत्यार्पणाचा विषय पुन्हा ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे जाईल. त्यांनी संमती दिल्यावरही न्यायालयांत अपिलांचे दोन टप्पे होऊ शकतात. त्यामुळे निरव मोदीला भारतात आणण्यास कदाचित दोन वषर्हे ी लाग ू शकतील. पण निदान तोपयतर््ं ा तो भारताच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, असे चित्र तरी असणार नाही. ‘ईडी’ने निरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या भारताखेरीज हाँगकाँग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, सिंगापूर व संयुक्त अरब अमिरातींमधील १,८७३ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टांच आणली आहे. आणखी ४८९ कोटींच्या मालमत्ता जप्तही करण्यात आल्या आहेत. यातून बँकांचा बुडालेला पैसा वसूल करण्यासाठी निरव मोदी खटल्यांमध्ये दोषी ठरावा लागेल. हे व्हायला वेळ लागेल. पण, देशातील बँकांचा पैसा लुबाडणारा जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी भारत सरकार त्याचा नेटाने पिच्छा पुरविते असा आश्वासक संदेश मल्ल्या व निरव मोदी यांच्या प्रकरणातून मिळेल, हेही कमी नाही. एक देश म्हणून भारताने हे करायलाच हवे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीतील मतांसाठी त्याचे श्रेय घेणे हा राजकीय करंटेपणा ठरेल.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याEnglandइंग्लंडIndiaभारत