शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Maharashtra Election 2019: मतदारांची विकासावर दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 2:55 AM

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे.

महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे. भाजप व सेनेने ही निवडणूक आपल्या संपूर्ण बळानिशी व भक्कम अर्थबळानिशी लढविली आहे. तर काँग्रेसने तीत आपले सारे बळ व नेतृत्व उतरविलेले दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपले सर्व नेते या निवडणुकीत पुरेशा जिद्दीने उतरविले.

प्रत्यक्ष शरद पवार वयाची ७८ वर्षे उलटल्यानंतरही या निवडणुकीत एखाद्या तरुणाच्या जोमाने लढताना दिसले. त्यांच्या पक्षातील अनेकांनी ऐनवेळी भाजपचा व सेनेचा आश्रय घेतला तरी पवारांची जिद्द त्यामुळे जराही कमी झाल्याचे दिसले नाही. याउलट काँग्रेस पक्षातच या निवडणुकीविषयीचा जोम कमी आढळला. राहुल गांधीच तेवढे काही मतदारसंघांत प्रचाराची भाषणे करून गेले. त्या पक्षाला आपले उमेदवारही अखेरच्या क्षणापर्यंत सर्वसंमतीने निवडता आले नाहीत. परिणामी प्रत्येक जिल्ह्यात वादावादी व भांडणे होताना दिसली. बाकीचे पक्षही त्यापासून दूर राहिले नसले तरी त्यांच्यातली भांडणे फार उघड झाली नाहीत. भाजप व शिवसेना ही निवडणूक आपल्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या बळावर व नरेंद्र मोदींविषयीच्या आदराच्या बळावर लढवीत आहे. ही युती सत्तेवर आहे आणि तिला सत्ता व प्रशासन या दोहोंचेही पाठबळ आपोआपच लाभले आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यावर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. प्रथम अवर्षण व नंतर अतिवृष्टीचा तडाखा राज्याला बसला. या आपत्तींनी सरकारची अक्षरश: परीक्षा घेतली. देवेंद्र फडणवीसांचे सरकार या परीक्षेत बऱ्यापैकी यश मिळविताना दिसले. या प्रमुख पक्षांखेरीज वंचित बहुजन आघाडीसारखे अन्य पक्ष व संघटना या निवडणुकीत उतरल्या आहेत. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यात आहे. मात्र या छोट्या पक्षांना फारसे भवितव्य नाही आणि त्यांचे म्हणावे तेवढे उमेदवार निवडूनही येणार नाहीत. जाणकारांच्या व लोकमानसाचा अभ्यास करणाºया संघटनांच्या मते या घटकेला भाजप-सेना ही युती विजयाच्या अधिक जवळ आहे. मात्र तिला पूर्वीएवढे मोठे बहुमत मिळणार नाही. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या या वेळी वाढलेली दिसेल. भाजपने शिवसेनेशी केलेली युती सेनेला लाभाची ठरली तरी ती भाजपला फारशी आशादायक असणार नाही. सेनेचे बरेच उमेदवार या निवडणुकीत पराभूत होतील असेच सध्याचे चित्र आहे. उमेदवार निवडताना निवडून येणारा उमेदवार प्रत्येक ठिकाणी पाहिला गेलाच असे नाही.

 

पुन्हा एकवार जात हाच निकष उमेदवाराच्या निवडीसाठी महत्त्वाचा ठरला. काही पक्षांत तर नेत्यांची घराणेशाहीही महत्त्वाची झालेली दिसली. अशा निवडणुकीत कार्यक्रम पत्रिका हरवते. पक्षांच्या ध्येयधोरणांना महत्त्व उरत नाही. महत्त्व असते ते उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांना. त्यामुळे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील एकाहून अधिक पुढारी यांनाच महत्त्व असेल व ही निवडणूकही त्याच बळावर लढविली जाईल. दोन गोष्टी मात्र ठळकपणे जाणवाव्या अशा आहेत. त्यातील पहिली बाब या निवडणुकीत संघाचा पुढाकार कुठे दिसला नाही.

त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य राष्ट्रीय नेते या निवडणुकीपासून दूर राहिलेले आढळले. त्यामुळे प्रत्यक्षात ही निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे. तीत नेत्यांहून मतदार महत्त्वाचा ठरण्याची शक्यता मोठी आहे व ते चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. नाही म्हणायला नरेंद्र मोदी व अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय नेते या निवडणुकीत ठिकठिकाणी सभा घेताना आढळले. परंतु त्यांची भाषणे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर न होता काश्मीर व देशाच्या इतर प्रश्नांवरच अधिक झालेली दिसली. राष्ट्रीय प्रश्न व प्रादेशिक प्रश्न यातला फरक देशाच्या वरिष्ठ नेत्यांच्याही ध्यानात पुरेसा आला नाही याचाच हा पुरावा मानावा लागेल. स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र ती त्रुटी भरून काढली. सत्तेवर कुणीही येवो त्याची दृष्टी राज्याच्या व जनतेच्या विकासावर असावी, अशीच अपेक्षा या वेळी साºया मतदारांच्या मनात असेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान