शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

विधिमंडळातील नेतृत्वहीन मराठवाडा

By admin | Updated: December 27, 2015 21:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह, नगरविकास आणि सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यांशिवाय वित्त, वने, सामाजिक न्याय, ऊर्जा अशी अत्यंत महत्त्वाची खाती आज विदर्भाकडे आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह, नगरविकास आणि सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यांशिवाय वित्त, वने, सामाजिक न्याय, ऊर्जा अशी अत्यंत महत्त्वाची खाती आज विदर्भाकडे आहेत. सोबतच नितीन गडकरींसारखे हेविवेट केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे विदर्भाला मेट्रोपासून टेक्स्टाईल पार्क, कौशल्य विद्यापीठापर्यंत अनेकानेक नवनवीन गोष्टी मिळत राहणार हे स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्र आधीच विकसित आहे. तेथील नेत्यांची कोणत्याही सरकारमध्ये कामे अडत नाहीत. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात नेतृत्वहीन मराठवाड्याची चिंता सातत्याने खंतावत राहिली. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे चित्र विधिमंडळात दिसलेच नाही. आज संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या भीषण छायेत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी खून पडतील की काय, अशी भीती वाटते. हे बघता तेथील आमदारांनी पक्षीय भेदाच्या भिंती पाडून आकाशपाताळ एक करायला हवे होते; दुर्दैवाने तसे झाले नाही. चॅनेलवाल्यांना बाईट देण्यापुरता आणि पेपरवाल्यांना हटके फोटो देण्यापुरताच मराठवाड्याच्या नेतेगिरीचा आव काही जण आणत होते, एवढेच. दुष्काळाबाबत मायबाप सरकारने दिलेले पॅकेज मराठवाड्यातील आमदारांनी निमूटपणे स्वीकारले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे या नेत्यांच्या पश्चात संपूर्ण मराठवाड्याची मोट बांधू शकेल आणि सर्वांना मान्य होऊ शकेल, असा नेता आज तरी दिसत नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भाऊबंदकीत अडकले आहेत. धनंजय एकदम राज्यव्यापी प्रश्न हाताळू लागले आहेत. काँग्रेसमध्ये नांदेड व लातूरचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. विलासरावांना मानणारा गट स्वत:ला पोरका मानतो. अमित देशमुखांना वडिलांची जागा भरून काढता आलेली नाही. लोकसभेचे सदस्य असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात क्षमता आहे, पण विरोधी पक्षात असल्याने त्यांना मर्यादा आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर जिल्ह्याबाहेर जायला तयार नाहीत. गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू झाल्याने रावसाहेब दानवे यांना दिल्ली सोडून महाराष्ट्रात परतावे लागल्यामुळे दिल्लीच्या सत्तेतील मराठवाड्याचा टक्काही संपला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याची लॉबी वगैरे अजिबातच नाही. कुणाचाही दरारा दिसत नाही. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या भागातील कळीचे मुद्दे सभागृहात ते सहजपणे ऐरणीवर आणू शकतात. पण एकदा राज्य पातळीवरचे महत्त्वाचे पद मिळाले की आपल्यातील प्रादेशिक जाणिवा विसरण्याचा कित्ता बऱ्याच नेत्यांनी आजवर गिरविला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक नेत्यांची नावे याबाबत घेता येतील. त्यामुळे बागडे त्याला अपवाद ठरतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही प्रादेशिक जाणिवेबाबत बहिरेपण स्वीकारत नाहीत. या भागाबाबत आणखी एक सल मनात येतो व तो म्हणजे प्रादेशिक असमतोलाची जाणीव करून देणाऱ्या धुरिणांचा अभाव. एकेकाळी गोविंदभाई श्रॉफ, सुधाकरराव डोईफोडे, केशवराव धोंडगे हे काम नेटाने करीत असत. ती पोकळी आज जाणवते. मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विधिमंडळात आपल्या भागाचा दबावगट निर्माण व्हावा अशी रणनीती आखली नाही तर आज सत्ताकारणात वजन असलेला मागासलेला विदर्भ कितीतरी पुढे निघून जाईल आणि मराठवाडा अन्यायाचे रडगाणे गात राहील. मार्चच्या अधिवेशनात तरी दबावगट दिसावा अशी अपेक्षा आहे. देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला येणाऱ्या आमदारांनी या दृष्टीने चर्चा सुरू करायला हरकत नाही. विमानाने ये-जा करणाऱ्यांना मग त्यांना साथ द्यावीच लागेल.- यदू जोशी